Ashadhi Ekadashi| मिरजेत आषाढीनिमित्त निघाल्या दिंड्या; मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी

शिवतीर्थ, मार्केटमध्ये चिमुकल्यांचा रिंगण सोहळा
Ashadhi Ekadashi
मिरजेत आषाढीनिमित्त निघाल्या दिंड्या; मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी
Published on: 
Updated on: 

मिरज : आषाढी एकादशीनिमित्त परंपरेप्रमाणे शनिवारी शहरातून बालगोपालांच्या अनेक दिंड्या निघाल्या. मिरज शिवतीर्थ व मार्केट परिसरात दोन ठिकाणी रिंगण सोहळा उत्साहात पार पडला.

आषाढी एकादशीनिमित्त मिरजेतील गर्डर विठ्ठल मंदिर, नळाखालील विठ्ठल मंदिर यांसह विविध विठ्ठल-रुक्मिणी मंदिरांमध्ये आषाढी एकादशीनिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील विविध शाळांमधून दिंडी काढण्यात आली. केंब्रिज इंटरनॅशनल स्कूल मिरज येथे आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. यानिमित्ताने शाळेत विठ्ठलाच्या मूर्तीचे पूजन विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक यांनी केले. शाळेतील विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा केली होती. विठ्ठलाच्या रूपाची वेशभूषा मुलांनी केली होती. काही मुलांनी विठ्ठलाची गाणी सादर केली.

मुलांनी विठ्ठलाच्या जीवनावर गाण्यांच्या माध्यमातून काही प्रसंग सादर करून सर्वांची मने जिंकली. वारकरी वेशभूषेतील मुलांनी पालखी घेऊन सभा मंडपामध्ये प्रवेश करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मिरजेतील महापालिका शाळांमध्ये आषाढी एकादशीनिमित्त विविध उपक्रम झाले. रा. वि. भिडे मूकबधिर शाळेतील विद्यार्थी वारकऱ्यांची वेशभूषा करून व विद्यार्थिनी नऊवारी साडी परिधान करून वारीमध्ये सहभागी झाल्या होत्या. विठ्ठल-रखुमाई, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर यांची वेशभूषा विद्यार्थ्यांनी केली होती. विविध अभंग, रिंगण, फुगड्या वारीमध्ये घालण्यात आल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news