मिरज हादरले! पत्नीला घरात ठेवण्याच्या वादातून मुलानेच केला जन्मदात्या आईचा खून

Miraj Crime| मानमोडी येथील घटना; फरार मुलाला काही तासांतच अटक
Miraj Crime News
संगीता झेंडे, जगदीश झेंडे
Published on
Updated on

कुपवाड : पत्नीला घरात ठेवण्याच्या कारणावरून पोटच्या मुलानेच जन्मदात्या आईचा खून केला. मानमोडी (ता. मिरज) येथे गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. संगीता जीवन झेंडे (वय 51, रा. झेंडे मळा, मानमोडी, ता. मिरज) असे मृत महिलेचे नाव आहे. खुनानंतर फरार संशयितास कुपवाड पोलिसांनी काही तासांतच अटक केली. जगदीश जीवन झेंडे (28, रा. झेंडे मळा, मानमोडी) असे संशयिताचे नाव आहे.

फिर्यादी बजरंग काशीद यांनी कुपवाड पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांची बहीण संगीता जीवन झेंडे या, पती व मुलासह मानमोडी येथील झेंडे मळ्यात राहत होत्या. बुधवार, दि. 15 रोजी सायंकाळी जीवन रात्रपाळीला कामावर गेले होते. संगीता व त्यांचा मुलगा जगदीश दोघेच घरात होते. जगदीश याची पत्नी सोनाली हिला घरात ठेवण्यावरून या दोघांत भांडण झाले. यावेळी रागातून संशयित जगदीशने घरात कोणी नसल्याचे पाहून संगीताचे तोंड, नाक, गळा दाबून खून केला. गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे जीवन रात्रपाळीच्या कामावरून घरी आले असता, हा खून उघडकीस आला.

20 ते 24 वयोगटातील तरुण

कुपवाड आणि परिसरात दहा दिवसांत तीन खून झाले. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. कुपवाडमधील दोन खून व मानमोडी येथील एक खून, या तीनही खुनात वीस ते चोवीस वयोगटातील तरुणांचा सहभाग आहे. तरुणाई व्यसनाच्या आहारी जाऊन गुन्हेगारीच्या विळख्यात सापडत असल्याचे पुन्हा पुन्हा उघड होत आहे. नशेखोरी आणि त्यातून गुन्हेगारी, अशा घटनांवर पोलिस कधी नियंत्रण मिळवणार?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news