

मिरज : मिरजेतील लक्ष्मी मार्केट परिसरातून मोहम्मद साद जमीर शेख (वय ७) याचे अपहरण झाले आहे. याबाबत मिरज शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, मोहम्मद साद शेख हा त्याच्या आईवडिलांसमवेत लक्ष्मी मार्केट येथे फुटपाथवर राहतो. दि. २३ मे रोजी मध्यरात्री तो लक्ष्मी मार्केट परिसरातून बेपत्ता झाला. आई-वडिलांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, परंतु तो मिळून आला नाही. याबाबत त्याच्या वडिलांनी मिरज शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मोहम्मद साद शेख हा बेपत्ता होऊन दहा दिवस उलटल्याने मिरज शहर पोलिसांनी त्याच्या शोधासाठी लूक आऊट नोटीस जाहीर केली आहे. सीसीटीव्हीच्या आधारे त्याचा शोध घेतला जात आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले.