Miraj Crime : मिरजेत भरदिवसा सराईत गुन्हेगाराकडून कोयत्याने दुकानाची तोडफोड

दोन वर्षापूर्वी झालेल्या वादातून कृत्य : एका तासात केले जेरबंद
Miraj Crime News
मिरजेत भरदिवसा सराईत गुन्हेगाराकडून कोयत्याने दुकानाची तोडफोड
Published on
Updated on

मिरज : दोन वर्षापूर्वी झालेल्या वादातून कोयत्याने दहशत माजवून भरदिवसा दुकानाची तोडफोड करण्यात आली. याप्रकरणी सराईत गुन्हेगार प्रथमेश तांदळे (वय 28, रा. कमानवेस, मिरज) याला मिरज शहर पोलिसांनी अटक केली. त्यानंतर तो राहात असलेल्या परिसरात पोलिसांनी त्याला फिरवले. त्याच्या घरी छापा टाकून कोयता जप्त केला.

शहरातील कर्मवीर भाऊराव पाटील चौक येथे मनोज चव्हाण यांचे दुकान आहे. दोन वर्षापूर्वी प्रथमेश हा त्यांच्या दुकानात गॉगल घेण्यासाठी गेला होता. त्यावेळी त्याने पाचशे रुपयांत दोन गॉगल देण्याची मागणी केली होती. परंतु त्याला दुकानदार मनोज यांनी नकार दिला होता. त्यामुळे त्यांच्यात वादावादी झाली होती. दोन वर्षापूर्वी झालेल्या वादाच्या कारणातून प्रथमेश हा बुधवारी सायंकाळी कोयता घेऊन मनोज चव्हाण यांच्या मनोज कलेक्शन या दुकानात गेला. त्याने सुरुवातील दुकानाच्या बाहेर ठेवलेल्या रॅकवर हल्ला केला. त्यानंतर दुकानाच्या काचेवर कोयता मारून काच फोडली. तसेच मनोज चव्हाण यांना ‌‘येथे धंदा करायची नाही‌’, अशी धमकी देऊन पलायन केले. ही घटना दुकानाबाहेरील सीसीटीव्हीत कैद झाली होती. मिरज शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक किरण चौगले, गुन्हे प्रकटीकरणचे सहायक निरीक्षक भैरवनाथ पाटील याच्यासह पथकाने प्रथमेश तांदळे याला अटक केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news