Miraj News : मिरजेतील व्यसनमुक्ती केेंद्राविरोधात तक्रार

आरोग्यमंत्र्यांना निवेदन ः बिलापोटी जादा रक्कम घेतल्याचा आक्षेप
Addiction Treatment Center
मिरजेतील व्यसनमुक्ती केेंद्राविरोधात तक्रार File Photo
Published on
Updated on

मिरज : सोलापूर जिल्ह्यातील एका रुग्णावर उपचार करून त्याच्याकडून जादा रक्कम मागितल्याची तक्रार संबंधित रुग्णाच्या नातेवाईकांनी आरोग्यमंत्र्यांकडे केली आहे. येथील एका रुग्णालय व व्यसनमुक्ती केंद्राविरोधात ही तक्रार आहे.

आरोग्यमंत्र्यांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, सोलापूर जिल्ह्यातील गावडी दारफळ येथील रुग्ण आठ महिन्यांपूर्वी येथील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल होता. येथे तो 40 दिवसांसाठी ॲडमिट होता. उपचार पूर्ण झाले होते. उपचार झाल्यानंतर 85,000 रुपये बिल घेतले होते. नंतर दोन ते तीन महिन्यांतच रुग्णाला आजाराच्या पुन्हा तक्रारी चालू झाल्या म्हणून आम्ही 4/12/2025 पासून उपचारासाठी ॲडमिट केले. परत 40 दिवसांच्या कोर्ससाठी पुन्हा 85,000 रुपये पॅकेजमध्ये ॲडमिट करून घेतले.

40 दिवसांचा कोर्स संपल्यानंतर आमचेकडून चार लाख एकवीस हजार रुपयांच्या वाढीव बिलाची मागणी केली. संबंधित रुग्णाचे वडील मृत झाले आहेत. आई वृद्ध असल्यामुळे त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे बिल भरण्याची स्थिती नाही. आम्ही नातेवाईक रुग्णालयामधील कर्मचारी व डॉक्टर यांना तीन महिन्यांपासून ठरलेली पॅकेजची फी घ्यावी व रुग्णाला डिश्चार्ज द्यावा, अशी मागणी वारंवार केली होती. तरी सदर रुग्णाची आई वयोवृद्ध असल्याने आमच्याकडून रक्कम वसूल न करता योग्य सूचना देऊन आम्हाला न्याय मिळवून द्यावा, असेही त्या पत्रात म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news