Miraj water supply : मिरज शहराचा पाणीपुरवठा आज बंद

कृष्णाघाट रस्ता येथील जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा बंद
 Water Supply
Water Supply File Photo
Published on
Updated on

मिरज : कृष्णाघाट रस्ता येथील जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्याने रविवारी मिरज शहराचा पाणीपुरवठा तात्पुरता बंद राहणार आहे.

मिरज शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जॅकवेलकडून येणाऱ्या मुख्य जलवाहिनीला कृष्णाघाट रस्ता लोखंडी पुलाजवळ मोठी गळती लागली आहे. दुरुस्तीचे काम करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. रविवारी सकाळी 10 वाजता हे काम सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे रविवारी दिवसभर पाणीपुरवठा होणार नाही. शहरातील काही भागांमध्ये आवश्यकतेनुसार टँकरने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news