Miraj Bribery case: गुंडेवाडीत ग्रामविकास अधिकारी, लिपिकाविरुद्ध लाचखोरीचा गुन्हा

बिल मंजूर करण्यासाठी ९५ हजारांची मागणी
Bribery Case
Bribery Case(Pudhari Photo)
Published on
Updated on

मिरज : गुंडेवाडी (ता. मिरज) ग्रामपंचायतीला पुरवलेल्या साहित्याचे थकीत बिल मंजूर करण्यासाठी ९५ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई केली. या प्रकरणी गुंडेवाडीच्या महिला ग्रामविकास अधिकारी वर्षा शंकर कदम (वय ४०, रा. खटाव, ता. मिरज) आणि लिपिक शरद दत्तात्रय चौगुले (४०, रा. खंडेराजुरी रोड, सिद्धेवाडी) यांच्याविरुद्ध मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

तक्रारदाराने गुंडेवाडी ग्रामपंचायतीला आवश्यक साहित्याचा पुरवठा केला होता. या पुरवठ्याचे प्रलंबित बिल मंजूर करून देण्यासाठी ग्रामविकास अधिकारी वर्षा कदम आणि लिपिक शरद चौगुले यांनी सुरुवातीला १ लाख २८ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी १७ जून २०२६ रोजी सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे अधिकृत तक्रार नोंदवली. या तक्रारीच्या आधारे पथकाने त्याच दिवशी पडताळणी कारवाई केली. या पडताळणीदरम्यान दोन्ही संशयितांनी पदाचा गैरवापर करत सुरुवातीला २८ हजार व नंतर ५ हजार रुपये कमी करून, तडजोडीअंती ९५ हजार रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. लाच मागितल्याचे सिद्ध झाल्यानंतर दोन्ही संशयित अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news