Miraj News : मिरजेच्या अमननगर परिसरात पाणीपुरवठा बंद

अमननगरमध्ये जलकुंभ दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा दोन दिवस बंद
Water Cut
मिरजेच्या अमननगर परिसरात पाणीपुरवठा बंद Pudhari
Published on
Updated on

मिरज : सुभाषनगर रस्त्यावर असणाऱ्या अमननगरमध्ये जलकुंभ दुरुस्ती 3 व 4 मार्च रोजी करण्यात येणार असल्याने हे दोन दिवस या परिसरामध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिकेच्या मिरज पाणीपुरवठा विभागांतर्गत सुभाषनगर रोड येथील अमननगर जलकुंभाला (पाण्याची टाकी) मोठी गळती लागली आहे. त्यामुळे बारगळेनगर परिसर, अमननगर आणि मिरज विभागीय क्षेत्रीय क्र. 4 चा अंतर्गत भाग, पश्चिम कॉलनी व जुना मालगाव रोड परिसर, श्री समर्थ कॉलनी, ए वन पार्क, पवनचक्की परिसर, दर्गा मोहल्ला आणि महादेव कॉलनी या भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news