

मिरज : मिरज-टाकळी रस्त्यावर दुचाकी आणि टेम्पोची धडक झाली. यामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला, तर एक गंभीर जखमी झाला. इरशाद रियाज मगदूम (वय 34, रा. मुजावर गल्ली, मिरज) असे मृत तरुणाचे नाव आहे, तर एराब शौकत देसाई (वय 32, रा. मुजावर गल्ली, मिरज) हा गंभीर जखमी झाला आहे.
इरशाद मगदूम हा आचारीकाम करतो. तो रविवारी काम आटोपून दुपारी टाकळीहून मिरजकडे येत होता. टाकळी रस्त्यावरील राष्ट्रीय महामार्गाच्या पुलाखाली टेम्पो आणि दुचाकीची धडक झाली. या अपघातात इरशाद याचा जागीच मृत्यू झाला, तर एराब हा गंभीर जखमी झाला. एराबवर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. याबाबत मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.