Miraj cattle seizure: मिरजेत कत्तलीसाठी आणलेली ३७ जनावरे, १४०० किलो गोमांस जप्त

मिरज शहर पोलिसांची कत्तलखान्यावर छापा : चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
Cattle Transport
Cattle TransportPudhari
Published on
Updated on

मिरज : शहरातील बोकड चौकात बेकायदेशीररित्या सुरू असणार्‍या कत्तलखान्यावर छापा टाकून मिरज शहर पोलिसांनी मोठी कारवाई केली. यावेळी कत्तलीसाठी आणलेल्या ३७ गायी, कालवड व म्हैस, अशी जनावरे जप्त करण्यात आली. तसेच कत्तल केलेले तब्बल १ हजार ४०० किलो गोमांस जप्त करण्यात आले. मिरज शहर पोलिसांनी ही कारवाई केली.

याप्रकरणी अजिज बेपारी, सलमान हारुण बेपारी, लाल्या आणि सूरज कबीर सय्यद (सर्व रा. मिरज) या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून ते पसार झाले आहेत. यापैकी लाल्या याच्यावर यापूर्वीही गोवंश हत्या केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.

मिरज शहरातील बोकड चौकामध्ये एका कत्तलखान्यात मोठ्या प्रमाणात गोहत्या करण्यात येणार असल्याची माहिती मिरज शहर पोलिस निरीक्षक किरण चौगले यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांच्या पथकाने बुधवारी सकाळी कत्तलखान्यात छापा टाकला. या ठिकाणी तब्बल एक हजार ४०० किलो गोमांस मिळून आले. तसेच कत्तल करण्यासाठी पाच मोठ्या गायी, २४ गोवर्गीय कालवडी आणि ८ म्हैसवर्गीय रेडके मिळून आले. या कालवडींचा आवाज होऊ नये म्हणून त्यांच्या तोंडाला चिकटपट्ट्या लावण्यात आल्या होत्या.

कारवाईमध्ये मिरज शहर पोलिस निरीक्षक किरण चौगले, सहायक निरीक्षक दत्तात्रय पुजारी, गुन्हे प्रकटीकरणचे सहायक निरीक्षक भैरवनाथ पाटील, उपनिरीक्षक विनायक मासाळे याच्यासह पोलिस अंमलदार सहभागी होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news