

मिरज : मटक्यासह दारू विक्री व अन्य बेकायदेशीर व्यवसाय चालणाऱ्या परिसरातील सुमारे २० अवैध खोक्यांवर महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने कारवाई केली.
बुलडोझर चालवून ही खोकी जमीनदोस्त केली. अमर थिएटर ते बस स्थानकदरम्यान रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. महापालिकेकडून गेल्या काही दिवसांपासून शहरात अवैध खोक्यांवर नियमित कारवाई केली जात आहे.
अमर थिएटर ते बस स्थानक रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीरपणे खोकी उभारण्यात आली होती. यातील काही खोक्यांमध्ये मटका, तर काहींमध्ये दारू विक्री व अन्य अवैध धंदे सुरू असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत ही कारवाई करण्यात आली.