

जत : तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीस ‘तुझ्याशी लग्न करीन’, असे आमिष दाखवून अत्याचार करण्यात आला. तसेच ‘ही घटना कुणाला सांगितलीस तर तुझे फोटो व्हायरल करीन’ अशी धमकी दोन वेळा बलात्कार करण्यात आला. याप्रकरणी संशयित यश भोसले (पूर्ण नाव नाही, रा. नवाळवाडी, ता. जत) याच्याविरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध, तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद पीडित मुलीने जत पोलिसात दिली.
पीडित अल्पवयीन मुलगी जत तालुक्यातील एका गावात राहते. संशयिताचा पीडितेशी परिचय आहे. याचा फायदा घेत त्याने दि. 13 नोव्हेंबररोजी पहाटे 2 वाजता, तसेच पुन्हा 22 नोव्हेंबर 2025 रोजी पीडितेच्या गावात जाऊन लग्नाच्या आमिषाने जबरदस्ती व फसवणूक करून शारीरिक संबंध ठेवले. पीडिता अल्पवयीन असल्याची माहिती असतानाही तिच्यावर अत्याचार केला. ‘ही घटना कुणाला सांगितलीस तर तुझे फोटो व्हायरल करीन’, अशी धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास उपविभागीय अधिकारी थोरबोले, निरीक्षक संदीप कोळेकर करीत आहेत.