

सांगली : लग्नाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्यामुळे ती गर्भवती राहिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तिने संशयित रोहित चव्हाण (रा. समतानगर, वेअर हाऊसनजीक, गल्ली नं. 9, मिरज) याच्याविरोधात सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी त्याच्याविरुद्ध बलात्कार आणि ‘पोक्सो’नुसार गुन्हा दाखल केला आहे. पीडित अल्पवयीन मुलगी शहरातील एका भागात राहते. संशयित रोहित चव्हाण याच्याशी तिची ओळख झाली होती. ओळखीचा फायदा घेत त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला लग्नाचे आमिष दाखवून मार्च 2025 मध्ये तिला सोबत नेले. शहरातील एका उपनगरात स्वतंत्र खोली घेतली. त्या ठिकाणी त्याने दि. 12 डिसेंबरपर्यंत तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. त्यामुळे पीडिता गर्भवती राहिली.