

सांगली : म्हैस आणि गाईच्या दूध दरामध्ये प्रति लिटर दोन रुपयांनी वाढ करण्यात आली असल्याची माहिती दूध आणि दुग्धजन्य पदार्थ उत्पादक असोसिएशन सांगली जिल्ह्याच्यावतीने प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकाद्वारे देण्यात आली आहे. नवी दरवाढ ही सोमवार दि. 5 मेपासून लागू करण्यात येणार आहे.
येथील गावभागमधील संघटनेच्या कार्यालयात रविवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी म्हशीचे दूध 66 रुपये, दर गाईचे दूध 50 रुपये लिटर (एक हजार मिलि) होते. ते आता म्हशीचे दूध 68, तर गाईचे दूध 52 रुपये लिटर करण्यात आले. यावेळी संघटनेचे संचालक चेतन दडगे, अनीश बोरकर, प्रमोद कुलकर्णी, विजयकुमार माळी, शीतल शिरगावे, निखिल पाटील, गौरव थोटे आदी उपस्थित होते.
म्हशीचे दूध एक लिटर 68 रुपये, गाईचे दूध एक लिटर 52. मलईयुक्त ताक 1 लिटर 40 रुपये झाल्याची माहिती सांगली जिल्हा दूध आणि दुग्धजन्य पदार्थ उत्पादक असोसिएशन यांच्यावतीने देण्यात आली.