Milk price hike : दूध आता 70 रुपये लिटर...

दोन रुपयांनी वाढ; संघटनेचा निर्णय
The price of milk
दूध आता 70 रुपये लिटर...File Photo
Published on
Updated on

सांगली : सांगली जिल्हा दूध व दुग्धजन्य पदार्थ उत्पादक असोसिएशनच्यावतीने म्हैस दुधाच्या खरेदी दरात वाढ झाल्याने दूध विक्रीच्या दरात दोन रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता प्रति लिटर दूध विक्रीचा दर 68 रुपयांवरून 70 रुपये झाला आहे. ही नवी दरवाढ शनिवारपासून लागू करण्यात आल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष चेतन दडगे, उपाध्यक्ष अनिश बोरकर यांनी दिली.

आता दूध, दुग्धजन्य पदार्थांचे नवीन दर पुढीलप्रमाणे असणार आहेत. (कंसात जुना दर) दूध एक लिटर 70 रुपये (68 रुपये) अर्धा लिटर 35 (34), दूध 200 मि.लि. 15 (15), एक किलो बासुंदी 300 रुपये (280), एक किलो खवा 400 (380), पनीर व लूज पनीर 420 रुपये (400).

गेल्या 3-4 वर्षात म्हैस दूध खरेदी दरात मोठी वाढ झाली. परंतु ग्राहकांचा विचार करता, सर्वच उपपदार्थांची दरवाढ एकत्रित न करता टप्प्या-टप्प्याने करण्यात आली आहे. यावेळेस दही, ताक, श्रीखंड, आम्रखंड, तूप यांचे दर न वाढवण्याचा निर्णय असोसिएशनकडून घेण्यात आला आहे.
- चेतन दडगे अध्यक्ष, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ उत्पादक असोसिएशन, सांगली

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news