Mhaisal water project
माडग्याळ ः येथील ओढ्यात म्हैसाळ योजनेचे पाणी दाखल झाले आहे.pudhari photo

...अखेर माडग्याळ ओढ्यात ‘म्हैसाळ’चे पाणी दाखल

Madgyal irrigation : सोन्याळ परिसरातील शेतीला होणार लाभ
Published on

जत शहर : जत तालुक्यातील सोन्याळसह परिसरातील शेतकर्‍यांनी गेल्या काही महिन्यांपासून म्हैसाळ योजनेचे पाणी मिळावे, यासाठी संघर्ष सुरू केला होता. त्यांच्या आंदोलनाला यश आले आहे. माडग्याळ ओढ्यात म्हैसाळ योजनेचे पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे सोन्याळ परिसरातून समाधान व्यक्त होत आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून पाणीटंचाईमुळे शेतकर्‍यांची अवस्था बिकट झाली होती. पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठी आवश्यक असणारे पाणी मिळवण्यासाठी शेतकर्‍यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. दि. 15 मे रोजी सोन्याळ फाट्यावर रास्ता रोको आंदोलन केले होते. दरम्यान, म्हैसाळ योजनेच्या अधिकार्‍यांनी लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.

नियोजन करून लवकरात लवकर माडग्याळ ओढ्यात पाणी सोडले जाईल, असे पत्रात नमूद केले होते. या आश्वासनाची अंमलबजावणी झाली व पाणी सोडले. यामुळे गेल्या दोन वर्षांपासून पाण्याअभावी अडचणीत आलेल्या शेतीस पुन्हा उभारी मिळणार आहे.

सोन्याळसह परिसरातील शेतकर्‍यांनी प्रशासनाच्या तत्परतेचे स्वागत करत यापुढील काळात शाश्वत व वेळेवर पाणीपुरवठा व्हावा, अशी मागणी केली. म्हैसाळचे पाणी पोहोचल्याने सोन्याळ परिसरातील शेतीला लाभ होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news