मिरजेत प्लास्टिक कारखान्याला भीषण आग

आगीत संपूर्ण कारखाना जळून खाक
Massive fire breaks out at plastic factory in Miraj
मिरजेत प्लास्टिक कारखान्याला भीषण आगFile Photo
Published on
Updated on

मिरज : पुढारी वृत्तसेवा

मिरज येथील शंभर फुटी रस्त्यावर असणाऱ्या एका प्लास्टिक कारखान्याला भीषण आग लागली. संबंधित कारखान्या शेजारी रस्त्यावरील कचरा पेटवण्यात आला होता. परंतु या कचऱ्याला लावण्यात आलेली आग प्लास्टिक कारखान्यातील प्लास्टिकला लागली. त्यामुळे पाहता क्षणी प्लास्टिक कारखान्यातील प्लास्टिकने पेट घेतला.

संबंधित कारखान्यात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक असून या प्लास्टिकला आग लागली आहे. अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. परंतु कंपनीत मोठ्या प्रमाणात प्लास्टिक असल्यामुळे आगीचे लोट परिसरात पसरलेत. मोठ्या प्रमाणात आग लागल्यामुळे तसेच कंपनीत प्लास्टिक असल्यामुळे अग्निशमन विभागाला आग आटोक्यात आणण्यासाठी अडचणीचा सामना करावा लागला. परंतु या आगीत कंपनी जळून पूर्णपणे खाक झाली. दोन ते तीन तासाच्या अथक प्रयत्नानंतर तब्बल सात अग्निशमन दलाच्या गाड्यांमार्फत ही आग आटोक्यात आणण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news