Woman harassment case: विवाहितेस व्हिडीओ पाठवून शरीर सुखाची मागणी

एकास अटक; सांगली शहर पोलिसांची कारवाई
Woman harassment case
Woman harassment caseFile Photo
Published on
Updated on

सांगली : विवाहित महिलेच्या सोशल अकाउंटवर वारंवार अश्लील व्हिडीओ पाठवून शारीरिक सुखाची मागणी करणाऱ्या संशयिताला शहर पोलिसांनी अटक केली आहे. निखिल दशरथ थोरबोले (रा. कोल्हापूर रोड, कबाडे हॉस्पिटलच्या मागे, सांगली) असे त्याचे नाव असून त्याच्याविरोधात 33 वर्षीय पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी थोरबोले याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केलेला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही नोकरदार आहे. डिसेंबर 2025 ते जानेवारी 2026 या कालावधीत संशयित निखिल थोरबोले हा आपल्या एका सोशल मीडिया अकाउंटवरून पीडित महिलेला मेसेज पाठवत होता. अनेक वेळा त्याने अश्लील व्हिडीओ पीडित महिलेच्या अकाउंटवर पाठवून शारीरिक सुखाची मागणी केली.

आपली मागणी मान्य न केल्यास सोशल मीडियाच्या माध्यमातून बदनामी करण्याची धमकीही तो पीडित महिलेला देत होता. त्याच्या या सततच्या त्रासाला कंटाळून शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news