

मांगले : मांगले (ता. शिराळा) येथील शेतकरी कुलदीप पाटील यांच्या शेतात ऊस तोड सुरू असताना कोल्ह्याची तीन पिले आढळली. वनविभागाच्या पथकाने परिस्थिती हाताळून परिसरात कॅमेरे लावले. त्यानंतर अवघ्या तीन तासात पिलांची आईशी पुर्नभेट झाली.
कुलदीप पाटील यांच्या शेतात ऊस तोडणी सुरु होती. त्यावेळी त्यांना कोल्ह्याची तीन पिले आढळून आली. ही माहिती वनविभागाला मिळताच वनविभाग, सह्याद्री रेस्क्यू वॉरियर्सच्य पथकाने त्वरित घटनास्थळी धाव घेतली. पिले असलेल्या ठिकाणी कॅमेरे लावून लोकांना दूर केले. सागर गवते, सहायक वनसंरक्षक नवनाथ कांबळे, वनक्षेत्रपाल एकनाथ पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल अनिल वाजे, वनरक्षक दत्तात्रय शिंदे, सह्याद्री रेस्क्यू वॉरियर्सचे सुशीलकुमार गायकवाड, धीरज गायकवाड, अक्षय डांगे, रेस्क्यू टीमचे संतोष कदम, नामदेव शिंदे, संपत देसाई उपस्थित होते.