Mangesh Chavan | मलईसाठी सत्ताधाऱ्यांचा 350 कोटी बोजाचा घाट : मंगेश चव्हाण

महापालिकेकडून चांगल्या रस्त्यांवर काँक्रिटीकरणाचा उपद्व्याप
Sangli Municipal Corporation
Sangli Municipal CorporationPudhari Photo
Published on
Updated on

सांगली : हॅमच्या (हायब्रीड ॲन्युईटी मॉडेल) माध्यमातून 11 रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याच्या हालचाली महापालिकेत सत्ताधारी व प्रशासनाने सुरू केल्या आहेत. मलईसाठी चांगल्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचा घाट घातला आहे. त्यातून महापालिकेच्या तिजोरीवर 350 कोटींचा बोजा पडणार आहे. ठेकेदारांना हाताशी धरून पैसे मिळवण्याचा उद्योग आहे. याविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी (श.प.) व शिवसेना रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशारा महापालिकेतील विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिला.

विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे गटनेते युवराज गायकवाड, शिवसेनेचे गटनेते युवराज बावडेकर, नगरसेवक संजय मेंढे, फिरोज पठाण, सुरेश बंडगर यांनी यावर हरकत घेतली.

चव्हाण म्हणाले, 11 रस्त्यांच्या काँक्रिटीकरणावर जीएसटीसह 227 कोटी रुपये खर्च होणार आहे. यातील 30 टक्के रक्कम महापालिकेला द्यावी लागणार आहे, तर 70 टक्के रक्कम ठेकेदाराकडून उभारली जाणार आहे. ही रक्कम व्याजासह दहा वर्षात परत करायची आहे. यातून महापालिकेवर 350 कोटींचा बोजा पडणार आहे. बावडेकर म्हणाले, वरिष्ठ अधिकारी, सत्ताधारी नगरसेवकांनी या रस्त्यांची पाहणी केली आहे. यावेळी काही ठेकेदारही उपस्थित होते. हे सर्व पूर्वनियोजित दिसत आहे.

ते 11 रस्ते व रक्कम

टिळक चौक, आझाद चौक, आमराई, राममंदिर : 27.64 कोटी

एसटी स्टँड, दिलीप टायर्स, शंभरफुटी रस्ता : 42.95 कोटी

कॉलेज कॉर्नर, राजवाडा चौक, माधवनगर बायपास : 27.30 कोटी

चिवटे हॉस्पिटल, स्टेशन रोड मिरज : 15.75 कोटी

भारत सूतगिरणी चौक, कुपवाड रोड : 13.76 कोटी

लक्ष्मी मार्केट, गुरूवार पेठ, डॉ. आंबेडकर पुतळा : 12.93 कोटी

लक्ष्मी मार्केट, बॉम्बे बेकरी, गांधी पुतळा : 13.95 कोटी

स्फूर्ती चौक, धामणी रोड : 9.42 कोटी

स्टँड, शिवाजी महाराज मार्केट, प्रतापसिंह उद्यान : 15.60 कोटी

शंभरफुटी रस्ता : 34 कोटी

स्वामी विवेकानंद चौक, माधवनगर रोड (चैत्रबन) : 13.39 कोटी

एकूण रक्कम (जीएसटीसह) : 227 कोटी रुपये

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news