Sangli News : बिगरशेती परवानगीच्या नावाखाली चार लाखांचा गंडा

अधिकाऱ्यांची नावे सांगून फसवणूक; गुन्हा दाखल करण्याचे तहसीलदारांचे आदेश
 fraud case
बिगरशेती परवानगीच्या नावाखाली चार लाखांचा गंडाpudhari photo
Published on
Updated on

जत : महसूल प्रशासनातील अधिकाऱ्यांचे नाव सांगून बिगरशेतीची परवानगी काढून देतो म्हणून जत तालुक्यातील टोणेवाडी येथील विशाल अंकुश टोणे यांना चार लाखाला गंडविल्याप्रकरणी जत येथील प्रमोद भीमराव सावंत याच्याविरुद्ध जत पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश जतचे तहसीलदार प्रवीण धानोरकर यांनी दिला आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी, टोणेवाडी येथील विशाल टोणे यांच्या मालकीची जमीन आहे. त्यांच्या जमिनीतीत बिअरबार व परमिट रूम उभारण्यासाठी अर्धा एकर जमीन बिगरशेती करण्यासाठी २०२३ मध्ये जत तहसील कार्यालयास अर्ज दाखल केला होता. बिगरशेतीची परवानगी मिळावी यासाठी टोणे यांनी एजंट म्हणून काम करणाऱ्या प्रमोद सावंत याच्याकडे हे काम सोपवले. महसूल विभागातील अधिकारी आपल्या ओळखीचे आहेत, काम करून देणे माझ्याकडे लागले म्हणून सावंत याने टोणे यांच्याकडून टप्प्या-टप्प्याने चार लाख उकळले. त्यानंतर मात्र टोलवाटोलवी करण्यास सुरुवात केली. संशय आल्याने विशाल टोणे यांनी तहसीलदार धानोरकर यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली. तहसीलदारांनी चौकशी केल्यानंतर टोणे यांच्या तक्रारीत तथ्य आढळून आले. सावंत याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्याचे आदेश तहसीलदारांनी दिले.

एजंटाविरोधात थेट संपर्क साधा : तहसीलदार

महसूल कार्यालयातील सर्व कामे नियमानुसार व विहित शुल्कानुसारच केली जातात. कोणतीही व्यक्ती शासकीय कामासाठी पैशांची मागणी करत असल्यास नागरिकांनी तत्काळ तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन तहसीलदार धानोरकर यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news