

इस्लामपूर : शहरासह राज्यामध्ये अनाधिकृत घरांना घरपट्टीच्या दुप्पट शास्तीकर आकारण्यात आला होता. त्याच्यामुळे नागरिकांना 10 हजारापासून 2-2 लाखापर्यंत शास्तीकर लागलेला होता. त्यामुळे प्रचंड असंतोष होता. विकास आघाडीचे अध्यक्ष विक्रम पाटील यांनी अनेकदा याप्रश्नी आंदोलने केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी 19 मे 2025 ला शास्तीकर रद्दचा अध्यादेश काढून नागरिकांना न्याय दिला. यामुळे येथील गांधी चौकात भाजप कार्यकर्त्यांनी पेढे व साखर वाटून आनंद साजरा केला.
यावेळी विक्रम पाटील म्हणाले, पहिल्या टप्प्यामध्ये 50 टक्के रक्कम रद्द होण्यासाठी जिल्हाधिकार्यांना अधिकार दिलेला आहे. शास्तीकराची पूर्ण रक्कम रद्द करण्यासाठी जिल्हाधिकार्यांनी शासनाकडे प्रस्ताव पाठवायचा आहे. त्यामुळे अन्याय झालेल्या सर्व मालमत्ताधारकांना न्याय मिळणार आहे.
या निर्णयानंतर गांधी चौकात भाजप कार्यकर्त्यांनी पेढे व साखर वाटून आनंद साजरा केला. यावेळी विक्रम पाटील, अध्यक्ष एस. डी. जाधव, उपाध्यक्ष श्रेया जाधव, प्रा. नामदेव पाटील, भूषण पवार, केतकी जाधव, अनिता कोठारी, प्रकाश पोरवाल, अॅड. नागनाथ चव्हाण, आनंदराव शिंदे, समीर आगा, सुरज वर्णे, बबन कदम, योगेश गोंदकर, आनंदराव शिंदे आदी उपस्थित होते.
शास्तीकर लागू झालेल्या मालमत्ता धारकांची गांधी चौक येथील विठ्ठल मंदिरात शनिवार, दि. 24 मेरोजी दुपारी 1 वा.जता पुढील नियोजनासाठी बैठक आयोजित केली आहे. या बैठकीस उपस्थित रहावे, असे आवाहन विक्रम पाटील यांनी यावेळी केले आहे.