

मिरज : सांगली, मिरज शहरांतील 96 धार्मिक आणि प्रार्थनास्थळांवरील ध्वनिक्षेपक हटवले आहेत. आणखी 138 ध्वनिक्षेपकही हटवले जाणार आहेत. मिरज शहरातील 80 मंदिरे, 70 प्रार्थनास्थळे, 2 चर्च आणि सांगलीतील 44 मंदिरे, 34 प्रार्थनास्थळे आणि 4 चर्च यांना नोटिसा बजावलेल्या आहेत.
कोणतेही धार्मिक स्थळ असो, त्यावरील विनापरवाना ध्वनिक्षेपक हटविण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार पोलिस महासंचालकांनी राज्यातील सर्व पोलिस ठाण्यांना याबाबतचे आदेश दिले आहेत. यानुसार धार्मिक स्थळांवरील विनापरवाना ध्वनिक्षेपक हटविण्याबाबत प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार पोलिसांनी नोटिसाही बजावल्या आहेत. मिरजेतील 85 आणि सांगलीतील 11 धार्मिक स्थळांवरील ध्वनिक्षेपक हटविण्यात आले आहेत. ज्या धार्मिक स्थळांवरील ध्वनिक्षेपक विश्वस्त हटवणार नाहीत, त्यांना दररोज पाच हजार रुपये दंडदेखील ठोठावण्यात येणार आहे. सांगली आणि मिरज शहरांत तब्बल 234 धार्मिक स्थळांना नोटिसा बजाविण्यात आलेल्या आहेत. त्यापैकी 96 धार्मिक स्थळांवरील ध्वनिक्षेपक हटवले आहेत. आणखी 138 ध्वनिक्षेपकही हटवले जाणार आहेत.