Leopard Attack : नेर्ले येथे बिबट्याचा शेतमजुरावर हल्ला

Leopard Attack
नेर्ले येथे बिबट्याचा शेतमजुरावर हल्लाPudhari File Photo
Published on
Updated on

नेर्ले : नेर्ले (ता. वाळवा) येथील माळीमळा परिसरात उसाच्या फडाला पाणी देत असलेल्या एका शेतमजुरावर बिबट्याने पाठीमागून झेप घेऊन हल्ला केला. मंगळवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेत बंडा नेमिस्टे (रा. कापूसखेड) हे जखमी झाले असून, बिबट्याशी झालेल्या झटापटीत ते सुदैवाने बचावले आहेत. या घटनेमुळे माळीमळा परिसरात भीतीचे प्रचंड वातावरण पसरले आहे.

कापूसखेड येथील बंडा नेमिस्टे हे मंगळवारी दुपारी सुभाष माळी यांच्या शेतात उसाला पाणी देत होते. सायंकाळी 4 च्या सुमारास अचानक वीजपुरवठा खंडित झाल्याने, नेमिस्टे हे पाणी बंद करून शेतातून घराकडे निघाले होते. ते काही अंतरावर चालत गेले असता, दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर पाठीमागून झेप घेतली.

अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे नेमिस्टे जमिनीवर कोसळले. बिबट्याने त्यांच्यावर हल्ला चढवला असता, नेमिस्टे यांनी जिवाच्या आकांताने बिबट्याशी प्रतिकार केला. या झटापटीत त्यांचा शर्ट फाटला. ते किरकोळ जखमी झाले. त्यांनी आरडाओरडा केल्यामुळे बिबट्याने उसाच्या फडाच्या दिशेने धूम ठोकली.

भरदिवसा झालेल्या बिबट्याच्या हल्ल्यामुळे शेतकरी आणि शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण आहे. उसाचे क्षेत्र जास्त असल्याने या भागात बिबट्यांचा वावर वाढला आहे. वनविभागाने तातडीने या परिसरात पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी माळीमळा आणि कापूसखेड परिसरातील नागरिकांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news