डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या पंधरा पुस्तिकांचे लोकार्पण

स्मृतिदिनानिमित्त आज सांगलीत कार्यक्रम
Dr. Narendra Dabholkar Death Anniversary
डॉ. नरेंद्र दाभोलकर Pudhari Photo
Published on
Updated on

सांगली : पुढारी वृत्तसेवा

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या 11 व्या स्मृतिदिनानिमित्त मंगळवार, दि. 20 ऑगस्टरोजी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा सांगली यांच्यावतीने डॉ. दाभोलकरांच्या 15 पुस्तिकांचा लोकार्पण सोहळा आयोजित केला आहे. ही माहिती अंनिसचे कार्यकर्ते राहुल थोरात, डॉ. संजय निटवे यांनी दिली. ‘नरेंद्र दाभोलकरांचा विचार घरोघरी’ या राज्यव्यापी अभियानांतर्गत डॉ. दाभोलकरांच्या पंधरा विषयांवरील 45,000 पुस्तिकांचे वितरण संपूर्ण महाराष्ट्रभर यानिमित्ताने होणार आहे.

Dr. Narendra Dabholkar Death Anniversary
सातारा : डॉ. दाभोळकर सामाजिक पुरस्कार बाबासाहेब कल्याणी यांना प्रदान

हा कार्यक्रम श्रीमती राजमती नेमगोंडा पाटील कन्या महाविद्यालयात, विश्रामबाग, सांगली येथे सकाळी दहा वाजता आयोजित केला आहे. यासाठी प्रमुख वक्त्या म्हणून प्रसिद्ध लेखिका नीलम माणगावे व कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. शैलबाला पाटील उपस्थित असतील. साहित्यिक आणि माजी शिक्षणाधिकारी नामदेव माळी, प्राचार्य व्ही. बी. चौगुले उपस्थित राहणार आहेत. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुस्तिकांचे लोकार्पण होईल. नीलम माणगावे या ‘डॉ. दाभोलकरांचे विचारधन’ या विषयावर बोलतील. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news