कुपवाड, सावळी येथे पंजे, नालसाबची भेटी उत्साहात

तांनग येथील हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक
Kupwad, Sawli at Panje, Nalsab meeting in excitement
कुपवाड : सावळी (ता. मिरज) येथील ग्रामपंचायतीच्या समोर सावळी व तानंग या दोन्ही गावांतील पंजे भेट पाहताना भाविकांची झालेली गर्दी.Pudhari Photo

कुपवाड : पुढारी वृत्तसेवा

कुपवाड शहरासह सावळी, तानंग येथे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या मोहरम उत्सवानिमित्त आज पंजे, नालसाब यांच्या भेटीचा कार्यक्रम वाजत गाजत, जयघोषात मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला.बुधवार, दि.17 रोजी पहाटे पाच वाजता कुपवाड शहरातील हजरत लाडले मशायक दर्ग्यातील 5 पंजे, कुपवाड मोहरमखाना 2 पंजे, कुपवाड नुरु ए इस्लाम मशीद 3 पंजे यांच्या भेटीचा कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने पार पडला. सायंकाळी मोहरमखान्यापासून मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली. तराळ गल्ली, दर्गा परिसर, लिंगायत, धनगर गल्ली, मोठी जैन बस्ती ते मुजावर गल्ली या प्रमुख रस्त्यावरून वाजत गाजत मोठ्या भक्तिभावाने मिरवणूक बुधगाव रोड मोहरमखान्याजवळ आली. मिरवणुकीची सांगता विहिरीत पंजे विसर्जन करून करण्यात आली. शुक्रवार, दि.19 रोजी सकाळी 10 वाजता मोहरमखाना येथे जियारत व महाप्रसाद वाटप कार्यक्रम होणार आहे.

Kupwad, Sawli at Panje, Nalsab meeting in excitement
सांगली : चांदोलीत वीजनिर्मिती सुरू; पावसाने धरण 60 टक्के भरले

सावळी व तानंग येथील पंजे मिरजेतील दर्ग्यात होणार्‍या पहाटेच्या भेटीला गेले होते. दुपारी पारंपरिक पद्धतीने गावातून वाजत गाजत मिरवणूक काढल्यानंतर ग्रामपंचायतीच्या समोर दोन्ही गावातील पंजे यांच्या भेटीचा कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला. यावेळी लहान मुलांसह वयोवृद्ध स्त्री, पुरुष व युवक, युवतींनी गर्दी केली होती. भेटीच्या कार्यक्रमानंतर तानंग येथील पंजेला मोठ्या भक्तिभावाने निरोप देण्यात आला. सायंकाळी पंजे, नालसाबची विसर्जन करण्यात आले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news