Sangli Fraud : कुपवाड एमआयडीसीतील कंपनीची 19 लाखांची फसवणूक

छत्तीसगडमधील विक्रेत्यावर गुन्हा दाखल
Sangli Fraud
कुपवाड एमआयडीसीतील कंपनीची 19 लाखांची फसवणूकPudhari
Published on
Updated on

कुपवाड : कुपवाड औद्योगिक वसाहतीमधील भारत इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर अँड मॅन्युफॅक्चरर्स प्रा. लि. या कंपनीची 19 लाख 9 हजार 122 रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. छत्तीसगडमधील एका पुरवठादार कंपनीने मालाने भरलेला ट्रक कुपवाडला न पाठवता परस्पर गायब केल्याप्रकरणी कुपवाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, भारत इलेक्ट्रिकल कंपनीचे व्यवस्थापक संतोष शिवगोंडा पाटील यांनी छत्तीसगडमधील भिलाई येथील अरिहंत सेल्स नेटवर्क, कन्सल्टंट अँड मार्केटिंग आर्यन आणि स्टील या कंपनीकडून साधारण 30 टन लोखंडी तार (जी.आय. वायर, स्टे वायर आणि बारबेड वायर) खरेदी केली होती. या मालाची एकूण किंमत 19 लाख 9 हजार 122 रुपये होती. 9 मार्च 2025 रोजी व्यवस्थापक पाटील यांनी या बिलाची संपूर्ण रक्कम संबंधित कंपनीला अदा केली होती. खरेदी केलेला 29.98 टन माल ट्रकमध्ये (क्र. एमएच 26 बीई 3811) भरून 9 मार्च रोजी कुपवाड एमआयडीसीकडे रवाना करण्यात आला होता. मात्र, हा ट्रक

कुपवाडला पोहोचलाच नाही.

संशयित उत्कर्ष जैन याने मालाने भरलेला हा ट्रक बुटीबोरी (नागपूर) येथून परस्पर दुसरीकडे नेऊन कंपनीची आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी व्यवस्थापक संतोष पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून कुपवाड पोलिसांनी संशयित उत्कर्ष जैन (अरिहंत सेल्स नेटवर्क, भिलाई, छत्तीसगड) याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. कुपवाड एमआयडीसी पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून मालासह ट्रकचा शोध घेतला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news