

सांगली : विजेचा वापर करूनही मासिक बिलांचा नियमित भरणा न झाल्याने महावितरणच्या कोल्हापूर परिमंडलात तब्बल 51 कोटी 77 लाख रुपयांची थकबाकी आहे. परिमंडलातील घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक, सार्वजनिक सेवा व इतर अशा विविध वर्गवारीतील 4 लाख 38 हजार 63 ग्राहकांकडे ही थकबाकी आहे. थकबाकी वसुलीसाठी गेल्या दोन महिन्यांत 5 हजार 498 ग््रााहकांचा वीजपुरवठा तात्पुरत्या स्वरूपात खंडित करण्यात आला आहे. महावितरणने थकबाकीदार ग््रााहकांनी देय दिनांकापूर्वी बिलांचा भरणा करून पुरवठा खंडित होण्याची कारवाई टाळावी, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील स्थिती
कोल्हापूर ग्रामीण -1 विभागात 52,568 ग््रााहकांकडे 3.41 कोटी, ग््राामीण-2 मध्ये 55,475 ग््रााहकांकडे 6.02 कोटी, जयसिंगपूर विभागात 36,397 ग््रााहकांकडे 3.16 कोटी, इचलकरंजी विभागात 26,961 ग््रााहकांकडे 6.11 कोटी, तर गडहिंग्लज विभागात 29,101 ग््रााहकांकडे 1.78 कोटी रुपयांची थकबाकी आहे. जिल्ह्यातील 2,571 ग््रााहकांचा वीजपुरवठा तात्पुरता खंडित करण्यात आला आहे.
सांगली जिल्ह्यातील स्थिती
सांगली शहर विभागात 42,033 ग््रााहकांकडे 6.52 कोटी, सांगली ग््राामीणमध्ये 41,488 ग््रााहकांकडे 3.93 कोटी, ईश्वरपूर विभागात 44,286 ग््रााहकांकडे 7.31 कोटी, कवठेमहांकाळ विभागात 34,046 ग््रााहकांकडे 3.47 कोटी, तर विटा विभागात 43,012 ग््रााहकांकडे 5.60 कोटी रुपयांची थकबाकी आहे. सांगली जिल्ह्यातील 2,927 ग््रााहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.
सुटीच्या दिवशीही बिल भरणा केंद्रे सुरू आहेत. ग््रााहकांना थकीत वीजबिलांचा भरणा सुलभ व्हावा यासाठी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील महावितरणची अधिकृत वीजबिल भरणा केंद्रे मार्च 2026 अखेरपर्यंत शनिवारी, रविवारी तसेच सार्वजनिक सुटीच्या दिवशीही कार्यालयीन वेळेत सुरू ठेवण्यात येणार आहेत, तसेच संकेतस्थळावर आणि महावितरणच्या मोबाईल ॲपद्वारे ग््रााहकांना केव्हाही, कुठूनही ऑनलाइन पद्धतीने बिल भरता येते. डिजिटल माध्यमातून भरणा केल्यास देय रकमेवर 0.25 टक्के सवलत देण्यात येत आहे. पाच हजार रुपयांपेक्षा अधिक बिल असणाऱ्या लघुदाब ग््रााहकांसाठी आरटीजीएस/एनईएफटी सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.