Pudhari EduDisha : ‘पुढारी एज्युदिशा’मधून सापडल्या करिअरच्या असंख्य दिशा

विद्यार्थी आणि पालकांची भावना; प्रचंड प्रतिसादात सांगता
Pudhari EduDisha
Pudhari EduDisha
Published on
Updated on

सांगली : ‘‘बारावीनंतर पुढं काय करायचं तेच समजत नव्हतं. अनेकजण अनेक मार्ग सांगत होते. त्यामुळे तर मनात नुसता गोंधळ झाला होता. अशा महत्त्वाच्या वळणावर दैनिक ‘पुढारी’च्यावतीने आयोजिलेले एज्युदिशा प्रदर्शन खऱ्या मार्गदर्शकासारखे मिळाले. या प्रदर्शनातून करिअरचे अनेक जुने आणि नवे मार्ग मिळाले. आमच्या करिअरला योग्य दिशा मिळाली. धन्यवाद दैनिक पुढारी..!’’ अशी भावना शेकडो विद्यार्थ्यांमधून व्यक्त झाली.

दैनिक पुढारीच्यावतीने येथील राममंदिर चौकातील कच्छी जैन भवनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या 'एज्युदिशा २०२६' या खास शैक्षणिक प्रदर्शनाची रविवारी सांगता झाली. कालचा रविवार प्रचंड प्रतिसादात संपला. या प्रदर्शनामधून करिअरच्या अनेक वाटा तर सापडल्याच, पण साऱ्या प्रश्नांना योग्य उत्तरे मिळाल्याची भावना व्यक्त झाली.

'पुढारी परिवार' नेहमीच गुणवत्तेचा सन्मान करतो. या प्रदर्शनादरम्यान दहावी व बारावीच्या परीक्षेत ७५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवून यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार मान्यवरांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी आप्पासाहेब बिरनाळे पब्लिक स्कूलचे प्राचार्य प्रदीप शिरोटे, आयडियल स्मार्ट स्कूल मिरजचे विश्वास पाटील, हेमंत सावंत, श्री दत्त विद्यामंदिर शिपुरचे मुख्याध्यापक विवेक कुंडले, मलकण्णावर इन्स्टिट्यूटचे अनंत मलकण्णावर, आदर्श शिक्षण मंदिरच्‍या श्रीमती संगीता प्रशांत कांबळे, फडके क्लासेसचे अनमोल गायकवाड, चाटे कोचिंग क्लासेसचे सुदाम पाटील, विजयश्री अकॅडमीचे संतोष पाटील या शिक्षकांचा गौरव करण्यात आला. या उपक्रमाचे मुख्य प्रायोजक 'संजय घोडावत युनिव्हर्सिटी, कोल्हापूर' असून, 'विश्वकर्मा युनिव्हर्सिटी, पुणे' हे पाॅवर्ड बाय प्रायोजक होते. यासोबतच एमआयटी विश्वप्रयाग युनिव्हर्सिटी, भारती विद्यापीठ डीम्ड युनिव्हर्सिटी, चाटे ग्रुप, डीआयसीई (DICE) डेक्कन इन्स्टिट्यूट हे या उपक्रमाचे सहप्रायोजक होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news