Sangli Fraud Case : कोल्हापुरातील भोंदूकडून महिलेला साडेतीन लाखांचा गंडा

मिरजेतील प्रकार : भूतबाधा उतरवणे, गुप्तधन शोधण्याच्या बहाणा
Sangli Fraud Case
कोल्हापुरातील भोंदूकडून महिलेला साडेतीन लाखांचा गंडा
Published on
Updated on

मिरज : मिरजेत भूतबाधा व घरातील गुप्तधन काढण्याचे आमिष दाखवून महिलेस खोटे सोने देऊन साडेतीन लाखाला गंडा घालण्यात आला. याप्रकरणी भामटा शशिकांत सीताराम भुजिंगे (वय 33, रा. पसरीचानगर, कोल्हापूर, मूळ गाव हलसवडे, ता. करवीर) या भोंदूला अटक करण्यात आली आहे.

मिरजेतील ब्राह्मणपुरी येथील एका महिलेच्या घरी दि. 17 एप्रिल 2025 रोजी शशिकांत भुजिंगे हा आला होता. फिर्यादी महिलेचा मुलगा हा गतिमंद असल्याने त्यांच्या मुलास भूतबाधा झाली आहे, असे सांगून संशयित शशिकांत भुजिंगे याने आपल्याकडे अघोरी दैवी शक्ती असल्याचे सांगून घरात सुख-समृद्धी आणतो. तुमच्या मुलास भूतबाधा झालेली आहे, त्याला बरा करून तुमच्या घरातील गुप्तधन बाहेर काढतो, असे आमिष दाखवून अंधश्रद्धा निर्माण केली. संबंधित महिलेचा विश्वास संपादन केला. कोल्हापूर जिल्ह्यातील मुडशिंगी व नेर्ले येथे माळरानावर तसेच तसेच फिर्यादी महिलेच्या मिरजेतील घरी महिला व तिच्या नातेवाईकांना नेऊन अघोरी विधी करून गुप्तधनाच्या नावाखाली फिर्यादीला खोटे सोने दिले.

त्या मोबदल्यात संबंधित महिलेकडून रोख व ऑनलाइन स्वरूपात तीन लाख 22 हजार रुपये स्वीकारून फिर्यादीची फसवणूक केली होती. या गुन्ह्याच्या अनुषंगाने मिरज शहर पोलिसांनी तत्काळ तपासाला सुरुवात केली. या प्रकरणातील भामटा भोंदू शशिकांत भुजिंगे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली मोटार मिरज शहर पोलिसांनी जप्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news