Sangli Crime: कवठेमहांकाळमध्ये चाकू हल्ला; आठ जणांविरोधात गुन्हा, संशयित अटकेत

शहराच्या मध्यवर्ती भागात उपकोषागार कार्यालयासमोर सोमवारी रात्री उशिरा कोंगनोळी येथील तरुणावर चाकू हल्ला झाला
 Crime News |
Pudhari File Photo
Published on
Updated on

कवठेमहांकाळ : शहराच्या मध्यवर्ती भागात उपकोषागार कार्यालयासमोर सोमवारी रात्री उशिरा कोंगनोळी येथील तरुणावर चाकू हल्ला झाला. या घटनेत मोहसीन दस्तगीर जमादार (वय 37, रा. कोंगनोळी, ता. कवठेमहांकाळ) गंभीर जखमी झाला आहे. हल्लाप्रकरणी आठ संशयितांविरोधात कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.

दि. 11 नोव्हेंबर रोजी रात्री फिर्यादीचा भाऊ मन्सूर, त्याची पत्नी साईशा, तसेच राहुल कांबळे व त्यांची पत्नी अनिशा हे सलगरे येथे झालेल्या मारहाणीची तक्रार देण्यासाठी कारने कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात आले. तक्रार देत असताना, संशयितांनी कारजवळ थांबलेल्या फिर्यादीवर अचानक हल्ला चढवला.

अतुल कांबळेच्या सांगण्यावरुनच रवी खत्री, प्रदीप मोरे, लोकेश नाईक, महादेव भंडारी, सोमनाथ डवरी, साहिल डफेदार, सत्तार महात आणि अतुल कांबळे हे दोन व चारचाकी वाहनातून आले. त्यांनी फिर्यादीस ‌‘आता याला जिवंत ठेवायचं नाही‌’ असे म्हणून मारहाण केली. रवी खत्रीने पोटात तर प्रदीप मोरे याने काखेजवळ चाकू भोसकून गंभीर जखमी केले.

रक्तबंबाळ अवस्थेत फिर्यादीस तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची नोंद कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात झाली. प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news