Kharsundi Chaitra Yatra : खरसुंडी येथे उद्यापासून खिलार जनावरांची चैत्र यात्रा

बाजार समितीचे सभापती संतोष पुजारी यांची माहिती
Kharsundi Chaitra Yatra
खरसुंडी येथे उद्यापासून खिलार जनावरांची चैत्र यात्रा
Published on
Updated on

आटपाडी : कृषि उत्पन्न बाजार समिती, आटपाडी व खरसुंडी ग्रामपंचायतीतर्फे खरसुंडी (ता. आटपाडी) येथे सिद्धनाथ देवाची पारंपरिक खिलार जनावरांची चैत्र यात्रा यंदा 10 ते 16 एप्रिल 2026 या कालावधीत आहे. ही माहिती बाजार समितीचे सभापती संतोष पुजारी यांनी दिली.

चैत्री यात्रा खरसुंडी गावाच्या उत्तरेकडील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार आवारात, चिचांळे-घाणंद रस्त्यावरील (सिमोल्लंघनाचे माळ) मोकळ्या पटांगणात होणार आहे. यात्रास्थळी पिण्याच्या स्वच्छ पाण्याची व्यवस्था, रात्रीच्या उजेडासाठी विजेची व्यवस्था, परिसराची स्वच्छता, सीसीटीव्ही कॅमेरे तसेच जनावरांच्या बाजारासाठी पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध असेल. याशिवाय शेतकरी, व्यापारी व नागरिकांसाठी वैद्यकीय सुविधाही ठेवण्यात येणार आहेत.

  • लम्पी आजाराची लागण झालेली जनावरे खरेदी-विक्रीसाठी आणू नयेत.

  • जनावरे केवळ निश्चित केलेल्या ठिकाणीच बांधावीत.

  • यात्रेत तीनपत्ती जुगार किंवा मटका टेबल आढळल्यास संबंधितांवर कडक कारवाई.

शेतकऱ्यांनो, बॅरल आणा

यात्रेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांनी पिण्याच्या पाण्याचा साठा करण्यासाठी स्वतःसोबत बॅरेल आणावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news