सांगली : दोन्ही गटांकडून यू टर्न; फिर्याद मागे

कवठेमहांकाळ नगरपंचायत सत्तासंघर्ष
Kavthe Mahankal Nagar Panchayat
कवठेमहांकाळ नगरपंचायत
Published on
Updated on

सांगली : विशेष प्रतिनिधी

कवठेमहांकाळ पंचायतीच्या सत्तासंघर्षात शनिवारी दोन्ही गटांनी फिर्याद मागे घेतली. आमदार सुमन पाटील, युवा नेते रोहित पाटील आणि माजी खासदार संजय पाटील यांच्या गटांनी परस्परविरोधी फिर्याद दाखल केली होती. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा गट आणि भाजपतर्फे संजय पाटील गटातर्फे या फिर्यादी दाखल झाल्या होत्या. पडद्यामागील घडामोडीनंतर त्या शनिवारी मागे घेण्यात आल्या. त्याची समाजमाध्यमात मोठी चर्चा झाली, तसेच दोन्ही गटांचे निवेदनही माध्यमात फिरत होते. दोन्ही गटांनी ‘यू टर्न’ घेतल्याची नेटकर्‍यांची प्रतिक्रिया होती. नगराध्यक्ष निवडीवरून शुक्रवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास कवठेमहांकाळ येथे राडा झाला होता.

Kavthe Mahankal Nagar Panchayat
सांगली : बांधकाम कामगारांचा लाभ ठेकेदारांच्या घशात

भाजपचे माजी खासदार संजय पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी माजी उपनगराध्यक्ष अय्याज मुल्ला यांना घरात घुसून मारहाण केली होती. मुल्ला यांच्या फिर्यादीनुसार माजी खासदार संजय पाटील यांच्यासह चार ते पाचजणांवर मारहाणीचा गुन्हा दाखल झाला होता. माजी खासदार संजय पाटील यांचे स्वीय सहायक खंडू होवाळे यांच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या काही पदाधिकार्‍यांविरोधात तक्रारी दाखल करण्याच्या हालचाली रात्री उशिरापर्यंत सुरू होत्या. रात्री बारा वाजण्याच्या सुमारास होवाळे यांची फिर्याद दाखल करून घेतली होती. दोन्ही गटांनी त्या मागे घेण्याचा निर्णय घेतला.

मुल्ला म्हणतात... मी गोंधळलेलो

मुल्ला यांच्या प्रतिज्ञापत्रामध्ये म्हटले आहे की, या घटनेशी माजी खासदार संजय पाटील यांचा कोणताही संबंध नसल्याचे आणि त्यांच्याकडून मारहाण झाली नसल्याचे माझ्या लक्षात आले. गोंधळलेल्या, घाबरलेल्या मन:स्थितीमध्ये ही बाब फिर्याद देताना मी चुकून सांगितल्याचे समजून आले. माझ्या तक्रारीवरून दाखल गुन्ह्याबाबत कोणावरही कारवाई करण्यात येऊ नये व तपास बंद करण्यात यावा.

होवाळे म्हणतात... तपास बंद करावा

माजी खासदार संजय पाटील यांचे स्वीय सहायक खंडू होवाळे यांनी प्रतिज्ञापत्रामध्ये म्हटले आहे की, या गुन्ह्याबाबत कोणावर कारवाई करण्यात येऊ नये. गुन्ह्याचा तपास बंद करण्यास माझी हरकत नाही.

‘लोक जागा दाखवतील’

दरम्यान, कवठेमहांकाळ शहरातील जत रोडवर बाजार कट्टा परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्यावतीने आयोजित निषेध सभा झाली. या सभेत खासदार विशाल पाटील, युवा नेते रोहित पाटील यांनी माजी खासदार संजय पाटील यांच्यावर टीका केली. लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीत लोकच माजी खासदार संजय पाटील यांना जागा दाखवतील, असा टोला त्यांनी लगावला.

Kavthe Mahankal Nagar Panchayat
सांगली : महापालिका क्षेत्रात 63 हजार मूर्तींचे विसर्जन

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news