Kavathe Mahankal Election : जिल्हा परिषदेसाठी 13, पंचायत समितीसाठी 26 अर्ज दाखल

तालुक्यात रणधुमाळीला सुरुवात; 334 उमेदवारी अर्जांची विक्री
Sangli Zilla Parishad
Sangli Zilla Parishad
Published on
Updated on

कवठेमहांकाळ : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कवठेमहांकाळ तालुक्यात राजकीय वातावरण तापू लागले असून निवडणूक रणधुमाळीला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. निवडणूक प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा असलेल्या उमेदवारी अर्ज विक्री व दाखल प्रक्रियेला इच्छुक उमेदवारांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. मंगळवार (दि. 20) अखेर तालुक्यात एकूण 334 उमेदवारी अर्जांची विक्री झाली आहे.

तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या चार जागांसाठी 13 उमेदवारी अर्ज, तर पंचायत समितीच्या आठ जागांसाठी 26 उमेदवारी अर्ज दाखल झाले असून दोन्ही निवडणुकांसाठी मिळून 39 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज विक्री व दाखल झालेल्या अर्जांची संख्या पाहता, आगामी निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याची चिन्हे स्पष्ट दिसून येत आहेत.

तहसील कार्यालय परिसरात दिवसभर गर्दी

कवठेमहांकाळ तहसील कार्यालय परिसरात सकाळपासूनच इच्छुक उमेदवार, तसेच त्यांचेसमर्थक यांच्याबरोबर विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.

नवे चेहरे मैदानात उतरण्याच्या तयारीत

जिल्हा परिषद व पंचायत समित्या या ग्रामीण भागाच्या विकासाच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या संस्था असल्याने या निवडणुकांकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे. शेतकरी, महिला, युवक, कामगार तसेच विविध सामाजिक घटकांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी अनेक नव्या चेहऱ्यांनीही निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी दाखविली आहे. त्यामुळे प्रस्थापित नेत्यांसमोर नव्या उमेदवारांचे आव्हान असणार, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

जि. प., पं. स. निवडणुकीसाठी मिरज तालुक्यातून 60 अर्ज

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मंगळवारी 49 उमेदवारांचे 60 अर्ज दाखल झाले. अर्ज दाखल करण्यासाठी मिरज तहसील कार्यालय आवारात उमेदवार व कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी उत्तम दिघे व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे-धुमाळ यांनी उमेदवारांचे अर्ज स्वीकारले.

जिल्हा परिषद गटातून 21 जणांचे 30 अर्ज दाखल झाले. यामध्ये भोसेत 8, एरंडोली 2, आरग 4, मालगाव 7, बुधगाव 2, कसबे डिग्रज 4, समडोळी 3, म्हैसाळ 2 असे अर्ज दाखल झाले. मिरज पंचायत समिती गणातून 28 जणांचे 30 अर्ज दाखल झाले. यामध्ये सोनीत 3, भोसे 4, एरंडोली 2, सलगरे 4, खटाव 1, बेडग 3, गुंडेवाडी 5, मालगाव 2, बामणोली 1, बुधगाव 2, कसबे डिग्रज 1, कवठेपिरान 1, म्हैसाळ 2, असे अर्ज दाखल झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news