Sangli Accident : ट्रॅक्टर चालकाची स्टंटबाजी; जिवावर आलं, पण बरगडीवर निभावलं!

मळणगाव येथे थरारक अपघात
Sangli Accident News
ट्रॅक्टर चालकाची स्टंटबाजी; जिवावर आलं, पण बरगडीवर निभावलं!
Published on
Updated on

कवठेमहांकाळ : मळणगाव (ता. कवठेमहांकाळ) येथे सोमवार, दि. 18 मे रोजी ट्रॅक्टरखाली शरीर गेल्यानंतरही विजय माळी या चालकाचा जीव वाचला. या थरारक घटनेनंतर जीवावर आले पण बरगडीवर निभावले, अशीच चर्चा रंगली होती.

मळणगाव येथील विजय अण्णाप्पा माळी हे सोमवारी दुपारी शेतात ट्रॅक्टरने नांगरणीसाठी गेले होते. दरम्यान, चालू ट्रॅक्टरवरून खाली उतरून ते पुन्हा स्टंट करत ट्रॅक्टरवर चढण्याचा प्रयत्न करू लागले. याच वेळी अचानक त्यांचा तोल गेला. पाय घसरल्यामुळे ते थेट चालू ट्रॅक्टरखाली सापडले. ट्रॅक्टरचे मोठे चाक त्यांच्या अंगावरून गेले. हा थरारक प्रकार पाहून नागरिकांची धावपळ उडाली. सुदैवाने या भीषण अपघातातून विजय माळी हे थोडक्यात बचावले. अपघातात त्यांच्या तीन ते चार बरगड्या मोडल्या. नागरिकांनी त्यांना तातडीने कवठेमहांकाळ येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी त्यांना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. या अपघाताबाबत सोमवार रात्री उशिरापर्यंत कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात कोणत्याही प्रकारची नोंद झालेली नव्हती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news