सांगली : दैनिक पुढारी कस्तुरी क्लबने 18 वर्षे पूर्ण करून 19 व्या वर्षात दिमाखदार पदार्पण केले आहे. या वर्धापन दिनानिमित्त गुरुवारी सांगलीतील कच्छी जैन भवनमध्ये उत्साहात आणि जल्लोषात स्नेहसंमेलन रंगले. धमाल गाण्यांवर कस्तुरी सदस्यांनी धमाल डान्स केला आणि आनंदोत्सव साजरा केला.
महिलांसाठी हक्काचे व्यासपीठ ठरलेल्या दैनिक पुढारी कस्तुरी क्लबच्या 19 व्या वर्धापन दिनानिमित्त कस्तुरी क्लबच्या सभासद महिलांसाठी गुरुवारी गाणी, डान्स अशी धमाल असणारे स्नेहसंमेलन पार पडले. साऊथ इंडियन पोषाखाची थीम असल्याने महिलांनी हौसेने वेशभूषा केली होती. कार्यक्रमाचे स्पॉन्सरर हॉटेल विजय अख्खा मसूर आणि सक्सेस अबॅकस हे होते. विविध चॅनेल्सवर नावलौकिक मिळवलेले लोकप्रिय गायक मिलिंद कुलकर्णी प्रस्तुत ‘जिंदगी एक सफर’ या हिंदी-मराठी गीतांच्या कार्यक्रमाने स्नेहसंमेलनात रंगत आणली. त्यांनी गायिलेल्या गीतांवर महिलांनी मनसोक्त डान्स केला. यशिवाय अनुराधा शेटे, कल्याणी मडके, संजीवनी शिंदे, नीशा करवडे, सुलभा कुलकर्णी, गौरी करजगी, अलका एडके, रजनी रजपूत, संगीता घाटगे, साक्षी गर्दे, पूजा जोशी, प्राजू बिरादार, कल्याणी कांबळे, शोभा जाधव, सुनीता करजगार, प्रिया बिरादार, अंबिका कुंभार, स्नेहा राजोपाध्ये, रेखा सरनोबत, डॉ. शुभांगी लिमये या व इतर कस्तुरी सदस्यांनी गाणी, डान्स यासह कविता सादर केल्या. त्यांना भरभरून दाद मिळाली.
सांगलीतील विजयनगर येथील हॉटेल विजय अख्खा मसूरचे विजय नरळे व सक्सेस अबॅकसच्या संस्थापिका ज्योत्स्ना जाधव यांचा सत्कार जाहिरात व्यवस्थापक प्रशांत कांबळे यांच्याहस्ते करण्यात आला. समन्वयक सोनाली ओतारी यांनी निवेदन केले.
सभासद नोेंदणीला मोठा प्रतिसाद
कार्यक्रमस्थळी कस्तुरी क्लबसाठी सुरू असलेल्या सभासद नोंदणीस मोठा प्रतिसाद मिळाला. श्रावण महिन्यात क्लबच्यावतीने अनेक बहारदार कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून बक्षिसांचे खजिनेही खुले होणार आहेत. महिलांनी या क्लबचे सभासद व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच नवीन सभासद नोंदणी सुरू झाली आहे. अधिक माहितीसाठी : सोनाली ओतारी - 7020767465.
