कुंभोजमध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती उत्साहात साजरी

चित्ररथ व प्रभातफेरीत हजारो विद्यार्थ्यांचा सहभाग
Sangli News
कुंभोज : येथील मुख्य बसस्थानक चौकात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना मान्यवर.Pudhari Photo
Published on
Updated on

कुंभोज : पुढारी वृत्तसेवा

शिक्षणाची गंगोत्री तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचवून शिक्षणाद्वारे स्वावलंबनाचा पाया भक्कम करणारे रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, थोर शिक्षणमहर्षी पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची 137 वी जयंती त्यांचे जन्मगाव कुंभोज (ता. हातकणंगले) येथे उत्साहात साजरी झाली. येथील कर्मवीर शैक्षणिक संकुल, रयत गुरुकुल पब्लिक स्कूल, केंद्रशाळा, कन्याशाळा, उर्दू शाळा, न्यू इंग्लिश स्कूल, गर्ल्स हायस्कूल, आश्रमशाळा या गावातील सर्व शाळांनी चित्ररथ व प्रभातफेरीत सहभाग घेतला.

कर्मवीर शैक्षणिक संकुलातील कर्मवीरअण्णा व रयतमाऊली लक्ष्मीबाई पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्यांना सरपंच स्मिता चौगुले, उपसरपंच अशोक आरगे यांच्याहस्ते, तसेच मुख्य बसस्थानक चौकातील अर्धपुतळ्यास गटनेते किरण माळी, माजी सरपंच प्रकाश पाटील यांच्या हस्ते, कुंभोज ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच स्मिता चौगुले, उपसरपंच अशोक आरगे यांच्याहस्ते, कर्मवीर भाऊराव पाटील यांचे जन्मस्थळ येथे जयसिंगपूर कर्मवीर मल्टिस्टेटचे संचालक अनिल भोकरे यांच्याहस्ते, कल्लाप्पाण्णा आवाडे, बाबासाहेब चौगुले यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कर्मवीरअण्णांच्या शैक्षणिक विचारांचा जागर करीत कुंभोज गावातील सर्व शाळांचे विद्यार्थी प्रभातफेरीत सहभागी झाले होते.

यावेळी कर्मवीर मल्टिस्टेटचे चेअरमन अरविंद मजलेकर, अ‍ॅड. अमित साजणकर, सदानंद महापुरे, जयश्री जाधव, विशाखा माळी, संभाजी मिसाळ, कलगोंडा पाटील, सुभाष देवमोरे, राजेंद्र भोसले, सचिन नामे, सचिन कोळी, रावसाहेब पाटील, न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक मिलिंद कुरणे उपस्थित होते. प्रा. सुभाष मसुटगे यांनी प्रास्ताविक केले. रयत गुरुकुल पब्लिक स्कूलचे मुख्याध्यापक सागर माने यांनी सूत्रसंचालन केले, तर कर्मवीर फौंडेशनचे अध्यक्ष सुशांत पाटील यांनी आभार मानले.

रयतमाऊली यांचा पुतळा उभारणार

कुंभोज येथील पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जन्मस्थळाची जागा जयसिंगपूर कर्मवीर मल्टिस्टेटने खरेदी केली असून या जागेवर पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील व रयतमाऊली लक्ष्मीबाई पाटील यांचा पुतळा बसवून त्या जागेचे सुशोभिकरण जयसिंगपूर कर्मवीर मल्टिस्टेटच्या माध्यमातून लवकरच सुरू होणार आहे. लवकरच या कामाला सुरुवात होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news