कराडचा पाणीप्रश्न 8 दिवसांत मार्गी लागणार

खा. श्री. छ. उदयनराजे यांच्या प्रयत्नामुळे तातडीने प्रश्न मिटला; जलदगतीने काम करण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश
Mr. Ch. Udayanaraje's efforts solved the water issue
खा. श्री. छ. उदयनराजे यांच्या प्रयत्नामुळे पाणीप्रश्न मिटलाPudhari File Photo
Published on
Updated on

कराडमधील बैठकीत शहराच्या पाणी प्रश्नाचा आढावा घेतल्यानंतर सातारा येथे खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी यशवंत विकास आघाडीचे नेते राजेंद्रसिंह यादव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ व अधिकार्‍यांसह जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची भेट घेतली. या बैठकीत शहराचा पाणी पुरवठा कायमस्वरूपी सुरळीत करण्यासाठी महत्त्वपूर्ण प्रश्न मार्गी लागला असून, महामार्गाच्या पुलावरून पाईपलाईन घेऊन पूर्ववत पाणीपुरवठा पाईपलाईनच्या माध्यमातून सुरू करण्यासाठी 71 लाख रुपयांची

Mr. Ch. Udayanaraje's efforts solved the water issue
कराड : बहिणीला त्रास देणाऱ्या दाजीचा मेव्हण्याने काढला काटा

जिल्हाधिकारी यांनी मंजूरी दिली आहे. तर जुन्या वॉटर वर्क्सच्या साहित्यासाठी लागणारा फंड व नवीन पाईपलाईनसाठीचा लागणारा खर्चही जिल्हा नियोजनमधून देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. ही कामे पुढील 8 दिवसांच्यापूर्वी पूर्ण करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या असल्याची माहिती असल्याची राजेंद्रसिंह यादव यांनी पत्रकारांना दिली. खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्यामुळे कराडचा पाणीप्रश्न तातडीने मार्गी लागला असल्याचे यादव यांनी यावेळी सांगितले. यावेळी माजी नगरसेवक विनायक पावसकर, स्मिता हुलवान, हणमंतराव पवार, विजय वाटेगावकर, बाळासाहेब यादव, गजेंद्र कांबळे, प्रितम यादव, निशांत ढेकळे, विनोद भोसले, संदीप मुंढेकर, ओमकार मुळे, उपअभियंता ए. डी. भोपळे, नगरपालिका अधिकारी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे एस. के. भोपळे, निवृत्त उपअभियंता यु. पी. बागडे यांची उपस्थित होती.

कराड तालुक्यात अतिवृष्टी; कृष्णा-कोयना नदीच्या पाणी पातळीत वाढ

राजेंद्रसिंह यादव म्हणाले, जुने वॉटर वर्क्स दुरूस्त करून त्याला 120 एचपी क्षमता असणार्‍या यंत्रणा जोडून 12 एमएलडीच्या आसपास पाणी सुरू करण्यात आले आहे. मात्र ही क्षमता वाढवण्यासाठी मोटर्स, स्टाटर्स आदी साहित्य खरेदी करण्यासाठी लागणारा फंड जिल्हा नियोजनमधून देण्यात येणार आहे. महामार्गाच्या पुलावरून पाईपलाईन घेवून पूर्ववत पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी 71 लाख रूपये जिल्हा नियोजन मधून देण्यात येणार असून तात्पुरत्या स्वरूपात 50 लाख रूपये डीपीजैन यांनी द्यायचे आहेत. तर उर्वरित निधी जिल्हा नियोजनमधून देण्यात येणार आहे. शहरातील रिव्हर्स क्रॉसिंग लाईन (रॉ वॉटर उचलणार्‍या पाईपलाईन) पाण्याखाली गेल्याने पाईपलाईनचे कितपत नुकसान झाले आहे त्यानुसार ती पाईपलाईन पूर्ववत सुरू करण्यासाठीचा निधी तोही जिल्हा नियोजनमधून देण्याचे जिल्हाधिकारी यांनी मान्य केले आहे. ही तीनही कामे मंजूर करण्यात आली आहे. दरम्यान, 6 कोटी 38 लाख रूपयांचा निधीचा प्रस्ताव मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे दिलेला आहे. तोही मान्य होणार असल्याचे खा. उदयनराजे भोसले यांच्याकडून सांगण्यात आले असल्याचे यादव यांनी सांगितले.

Mr. Ch. Udayanaraje's efforts solved the water issue
कराड : पालिकेच्या मीटरप्रमाणे पाणी पुरवठ्याबाबत संभ्रम

बैठकीत खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी कराडच्या पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी विविध पर्यायांची माहिती जिल्हाधिकारी डुडी यांना दिली. त्यामुळे यावेळी जलशुद्धीकरण केंद्राची कोयना नदीतील नवीन पाईप लाईन टाकणे, नवीन कोयना पुलावरून पर्यायी पाईप लाईन जलशुद्धीकरण केंद्रात आणणे, जुन्या जॅकवेलला नवीन मोटर खरेदी व इतर साहित्य खरेदी करणे, मलकापूरचे सांडपाणी संगम हाँटेलसमोरून हायवे क्रासिंग करून वळणे आदी कामे मार्गी लागली आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news