

जत : जत तालुक्यातील बिळूर येथे ऑक्टोबरमध्ये दिलेल्या प्रवचनात लिंगायत समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याबद्दल कणेरी मठाचे मठाधीश अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामींवर जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याप्रकरणी शंकरगौड शिवनगौंड बिरादार (रा. बसवन बागेवाडी, ता. बसवन बागेवाडी, जि. विजयपूर, कर्नाटक) यांनी बसवन्न पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ती झिरो क्रमांकाने जत पोलिस ठाण्यात वर्ग झालेली आहे.
फिर्यादीत म्हटले आहे की, अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी (कणेरी मठ) यांनी 9 ऑक्टोबर 2025 रोजी जत तालुक्यातील बिळूर विरक्त मठाचे सार्वजनिक कार्यक्रमात प्रवचन दिले होते. त्यामागे लिंगायत समाजाच्या लोकांमध्ये द्वेष पेरण्याचा उद्देश होता. तसेच समाजाच्या एकोप्याला धक्का आणणारे कृत्य त्यांनी केले आहे. समाजामध्ये शांती, एकोप्यास धक्का पोहोचवण्यासाठी प्रवचन दिल होते. अशा प्रवचनामुळे लिंगायत समाजबांधवांना धक्का बसून त्यांच्या भावना दुखावलेल्या आहेत. दरम्यान, जत पोलिस ठाण्यात शनिवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.