Sangli News : कळंबी येथे महामार्गावर 40 लाखांची चांदी जप्त

महसूल विभाग व पोलिसांच्या संयुक्त पथकाची कारवाई
Silver seized Kalambi
कळंबी येथे महामार्गावर 40 लाखांची चांदी जप्तFile Photo
Published on
Updated on

मिरज ः जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या तपासणीत कळंबी (ता. मिरज) येथे महसूल विभाग व पोलिसांच्या संयुक्त पथकाने महामार्गावर सुमारे 15 किलो चांदी जप्त केली. या चांदीची अंदाजे किंमत 40 लाख रुपये आहे.

आचारसंहितेमुळे महसूल व पोलिस विभागामार्फत महामार्गावर वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. गुरुवारी दुपारी कळंबी परिसरात एका मोटारीची तपासणी करताना 15 किलो चांदी मिळून आली. हुपरी (जि. कोल्हापूर) येथून चांदी घेऊन आलेल्या संबंधित व्यक्तीस चांदी व मोटारीसह ताब्यात घेण्यात आले. मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत त्याची चौकशी सुरू होती. ही चांदी हुपरी येथून सोलापूरकडे व्यापारासाठी नेली जात असल्याचे संबंधिताने सांगितले, मात्र याबाबत जीएसटी विभागामार्फत खरेदीची बिले व इतर कागदपत्रांची छाननी सुरू असल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news