Sangli : ‘अब एकी का कर दो पुकारा...’

कडेगावात हजारोंच्या उपस्थितीत गगनचुंबी ताबुतांच्या भेटी
Sangli News
कडेगावात हजारोंच्या उपस्थितीत गगनचुंबी ताबुतांच्या भेटी
Published on
Updated on
रजाअली पिरजादे

कडेगाव शहर : जोराचा वारा आणि पावसाच्या बरसातीत ‘इमाम हुसेन झिंदाबाद, मौला अली झिंदाबाद, धूला.. धूला..’ अशा घोषणा घुमत होत्या. ‘प्यारा प्यारा हमारा देश प्यारा, अब एकीका कर दो पुकारा’, ‘हिंदू-मुस्लिम साथ रहेंगे, एकीसे सागर पार करेंगे..’ अशा ऐक्याच्या हाका गगनाला भिडत होत्या. ऐक्याची कसम घेत भर पावसात कडेगावचा ताबूत भेटीचा सोहळा संपन्न झाला. कर्नाटक आणि महाराष्ट्रातून आलेल्या हजारो भाविकांनी या सोहळ्याचा आनंद लुटला.

सांगली जिल्ह्यातील कडेगावात गेल्या 150 वर्षांपासून मोहरम सणात धार्मिक ऐक्य आणि सामाजिक सलोखा जपला जातो आहे. आजही ही परंपरा जपली गेली. सामाजिक सलोखा जपणारा आणि उंच ताबुतांसाठी प्रसिद्ध असलेला कडेगाव मोहरमच्या ताबूत भेटीचा दिमाखदार, डोळ्यांचे पारणे फेडणारा सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने थाटात संपन्न झाला. हा भेटीचा सोहळा पाहण्यासाठी महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांतून हजारो भाविक आले होते. विशेषतः सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे जिल्ह्यांतील भाविकांची मोठी गर्दी होती.रविवारी (दि. 6) सकाळी पावसाच्या वातावरणात आणि भर पावसात पारंपरिक पद्धतीने कडेपूर, शिवाजीनगर, विहापूर, सोहोली, निमसोड गावांतील मानकर्‍यांना वाजत- गाजत आणण्यात आले. त्यानंतर विधिवत मानकर्‍यांच्याहस्ते पूजा करून सकाळी 11 वाजता मानाचा सातभाई ताबूत उचलण्यात आला. येथून भेटी सोहळ्यास प्रारंभ झाला.

हा ताबूत वीज बोर्डजवळ येऊन थांबला. तेथे देशपांडे, हकीम, शेटे यांचे ताबूत येऊन मिळाले. हे सर्व ताबूत पाटील चौकात आणण्यात आले. त्यानंतर बागवान, आत्तार, शेटे, आणि अन्य उंच ताबूत मानाप्रमाणे उचलण्यात आले. त्यानंतर हे सर्व ताबूत पाटील चौकात आल्यानंतर पाटील यांचा भव्य मोठा आकर्षक ताबूत उचलण्यात आला. हा ताबूत उचलल्यानंतर ताबुतांच्या गळाभेटी सोहळ्यास खर्‍याअर्थाने प्रारंभ झाला. ‘या हुसेन, हक हुसेन, इमाम हुसेन झिंदाबाद, मौला अली झिंदाबाद...’चा जयघोष करीत मानाच्या सातभाई- पाटील - बागवान - अत्तार - हकीम, देशपांडे या उंच ताबुतांच्या प्राथमिक भेटी 12 वाजता संपन्न झाल्या. पाऊस या भेटीचा साक्षीदार झाला. या भेटी म्हणजे राम-भरताची भेट म्हणून लोकांनी आकाशात फेटे, टोप्या उंचावून त्यांचे स्वागत केले आणि भेटी सोहळ्याचा आनंद लुटला.

या भेटी म्हणजे राम-भरताची भेट म्हणून लोकांनी आकाशात फेटे, टोप्या उंचावून त्यांचे स्वागत केले आणि भेटी सोहळ्याचा आनंद लुटला. त्यानंतर हे सर्व ताबूत मानाप्रमाणे वाजत गाजत मुख्य भेटीच्या ठिकाणी सुरेशबाबा देशमुख चौक (मोहरम मैदान) कडे निघाले. यावेळी ‘इमाम हुसेन झिंदाबाद, मौला अली झिंदाबाद, धूला.. धूला..’ अशा घोषणा देण्यात येत होत्या.याठिकाणी मेलवाल्याकडून ‘महान भारत देश अमुचा घुमवू जय जयकार’, तसेच ‘प्यारा प्यारा हमारा देश प्यारा, अब एकी का कर दो पुकारा’, ‘हिंदू-मुस्लिम साथ रहेंगे, एकी से सागर पार करेंगे’ अशी ऐक्याची हाक देत राष्ट्रीय एकात्मतेची गाणी म्हणण्यात आली. त्यानंतर हिंदू मानकर्‍यामार्फत मसूद माता ताबूत पंजे, बारा इमाम पंजे मानकर्‍यामार्फत आणण्यात आल्यावर मुख्य भेटीचा सोहळा सुरू झाला. या सोहळ्याला खासदार विशाल पाटील, आमदार डॉ. विश्वजित कदम, आमदार अरुण लाड, माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, डॉ. जितेश कदम, विश्वतेज देशमुख, नगराध्यक्ष धनंजय देशमुख, प्रांताधिकारी रणजित भोसले, तहसीलदार अजित शेलार, मुख्याधिकारी पवन म्हेत्रे, उपस्थित होते. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news