Moneylending Case : कडेगाव तालुक्यात सावकार बेलगाम

अनेक कुटुंबे देशोधडीला ; स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष : कडक कारवाईची गरज
Moneylending Case
कवठेपिरान चे आणखी आठ सावकार रडारवर
Published on
Updated on

रजाअली पिरजादे

कडेगाव शहर : तालुक्याला दिवसेंदिवस सावकारीचा विळखा आवळू लागला आहे. व्यवसाय कोण करीत आहे हे माहीत असूनदेखील स्थानिक प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याची चर्चा आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन सावकारांच्या मुसक्या आवळाव्यात, अशी मागणी होत आहे.

तालुक्यात कडेगाव शहराची बाजारपेठ सर्वात मोठी आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आणि अनेक व्यावसायिकांच्या आर्थिक गरजा मोठ्या आहेत. व्यवसायाच्या गरजा आणि कुटुंबाच्या अडचणी भागविण्यासाठी बँका, पतसंस्था यांच्याकडे कर्जासाठी हेलपाटे मारून बेजार झालेल्या व्यापारी व त्यांच्या कामगारांना लक्ष्य करून येथील बाजारपेठेतील खासगी सावकारी बोकाळली आहे. पानपट्टीपासून मोठ्या व्यापारापर्यंत सावकारीचा उद्योग सुरू आहे. विशेष करून शासकीय कार्यालय आवारात हे सावकार किंवा त्यांचे पंटर मोठ्या प्रमाणात वावरतात. कुटुंबातील कोणी आजारी असो, लग्न असो, शेतातील कोणतेही काम असो किवा व्यवसायात येणारी कोणतीही अडचण असो, याचा गैर फायदा सावकार घेत आहेत.

स्थानिक प्रशासन काय करते ?

सावकारीच्या या व्यवसायात दलालांची संख्या मोठी आहे. याबाबत स्थानिक प्रशासनाला माहिती असूनदेखील जाणूनबुजून दुर्लक्ष केले जाते. कडेगावात सावकारावर प्रशासनाने छापा टाकला आहे असे कधीच घडले नाही. तालुक्यात मोजकीच सावकारी परवानाधारक असून सावकारी विरोधात नावालाच पोलिसात तक्रारी दाखल झाल्या आहेत.

बेरोजगार तरुणांचा वापर

शिकून सवरूनदेखील नोकरी न मिळाल्याने तसेच पूर्ण अशिक्षित असलेला तरुण वर्गाचा मोठ्या प्रमाणात भरणा या व्यवसायात केला जात आहे. त्यासाठी तरुण वर्गाला कमिशनचे आमिष दाखण्यात येते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news