

Walwa Panchayat Samiti Results 2026
ईश्वरपूर : ईश्वरपूर,आष्टा नगरपालिकेनंतर जिल्हा परिषद - पंचायत समिती निवडणुकीतही वाळवा तालुक्यात महायुतीचे पानिपत झाले आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने येथे 22 पैकी 14 जागा जिंकत वाळवा पंचायत समितीवर पुन्हा वर्चस्व मिळवले आहे.
तर जिल्हा परिषदेच्या 11 पैकी 8 जागा महाविकास आघाडीला मिळाल्या आहेत. तर महायुतीला केवळ 3 जागा मिळाल्या आहेत. या निकालाने आ. जयंत पाटील यांचे तालुक्यावरील वर्चस्व पुन्हा अधोरेखित केले आहे.
जिल्हा परिषदेच्या रेठरे हरणाक्ष, कासेगाव,वाटेगाव,पेठ, बोरगाव, बावची, येलूर या 7 गटात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर चिकुर्डे मतदारसंघात शिवसेना उबाठाने विजय मिळवला आहे. कामेरी गटात भाजप, वाळवा गटात शिवसेना तर बागणी गटात रयत क्रांतीने विजय मिळवला आहे.
येलूर गटात भाजप च्या हर्षदा महाडिक यांचा तर बोरगाव येथे काँग्रेसच्या जयश्री पाटील यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. महायुकडून भाजपचे जयराज पाटील शिवसेनेचे संताजी मेटकरी, रयत क्रांतीच्या मोहिनी खोत हे विजयी झाले आहेत.