Jayant Patil: निवडणुकीत विजयासाठी भाजपला प्रचंड मेहनत घेण्याची वेळ

आ. जयंत पाटील; पुन्हा परिस्थिती बदलू शकते
Jayant Patil
Jayant PatilPudhari
Published on
Updated on

सांगली : नुकत्याच झालेल्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेस, डीएमके या पक्षांचा पराभव झाला. भाजपने प्रचंड मेहनत घेऊन हा विजय मिळविला असल्याचे दिसून येते, असे मत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी व्यक्त केले.

येथे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालांवर प्रतिक्रिया देताना ते बोलत होते.

ते म्हणाले, निवडणुकीत मतदारांनी स्थानिक प्रश्न, विकासकामे आणि जनतेशी जोडलेले नेतृत्व यांना प्राधान्य दिले. निवडणुकीतील निकाल हे लोकशाहीतील जनतेच्या भावना व्यक्त करणारे असतात. प्रत्येक पक्षाने या निकालांचा अभ्यास करून पुढील वाटचाल ठरवावी लागेल. काही राज्यांमध्ये सत्तांतर झाले असले तरी, देशातील राजकीय परिस्थिती सतत बदलणारी असून आगामी काळात विरोधी पक्ष अधिक ताकदीने जनतेसमोर येतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news