

जत : येथे दि. 13 मार्च 2025 रोजी वळसंग हद्दीतील 1596, 1597, 1598 या बोगस खरेदी दस्ताची चौकशी करावी, या दस्ताची सात-बारा व फेरफार सदरी नोंद धरू नये, संबंधित अधिकार्यांना बडतर्फ करावे, या मागणीसाठी दलित महासंघ मोहिते गटाच्यावतीने बुधवारी जत येथील प्रशासकीय भवनसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात जिल्हाध्यक्ष प्रशांत केदार, संस्थापक अध्यक्ष उत्तम मोहिते सहभागी झाले होते.
प्रांताधिकारी अजयकुमार नष्टे यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, वळसंग हद्दीतील गट नंबर 692 व 693 मधील अनुक्रमे 4.39 हे.आर. व 6.83 हे. आर. क्षेत्राचा दि. 13 मार्च 2025 रोजी बोगस दस्त करण्यात आला आहे. हा दस्त बेकायदेशीर आहे. कंपनीचे एजंट व अधिकार्यांनी शेतकर्यांची फसवणूक केली आहे. वळसंग हद्दीतील साळे कुटुंबियांच्या जागेची कंपनीच्या खासगी एजंटानी अधिकार्यांना हाताशी धरून चुकीच्या पद्धतीने बोगस दस्त नोंदणी करून विक्री केली आहे.
यावेळी नितीन जाधव, बापू साळे, रामू साळे, केदारी साळे, नवनाथ जाधव, शिवाजी साळे, नवनाथ पवार, नामदेव साळे, यल्लपा साळे, केंचराया साळे, गोविंद सगळे उपस्थित होते.