Sangli News : जत तालुक्यात दुष्काळाची तीव्रता वाढली

चारा डेपो सुरू करण्याची मागणी : ४९ गावांत ५२ टँकरने पाणीपुरवठा
Sangli News
जत तालुक्यात दुष्काळाची तीव्रता वाढली
Published on: 
Updated on: 

जत : जत तालुक्यात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून, पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. विहिरी, कूपनलिका आणि बोअरवेल यांनी तळ गाठला असून, जनावरांना पाणी आणि चारा मिळणेही मुश्कील झाले आहे. सध्या तालुक्यातील ४९ गावांत ५२ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. येळवी आणि कुणीकोणूर येथील टँकरचे प्रस्ताव प्रलंबित आहेत. चाऱ्याचे दर वाढल्याने शासनाने तातडीने चारा डेपो सुरू करावेत, अशी मागणी होत आहे.

पाण्यासाठी भटकंती; शेतकरी संकटातपावसाअभावी शेतीची कामे ठप्प झाली असून, शेतकरी आणि शेतमजुरांच्या हाताला काम मिळत नाही. उपलब्ध पाणी उपसण्यासाठी पुरेशा दाबाने वीजपुरवठा होत नसल्याने अडचणी वाढल्या आहेत. पाणीटंचाईमुळे शेती, पशुपालन आणि ग्रामीण जनजीवन विस्कळीत झाले आहे.

चाऱ्याचे दर गगनाला

मेंढपाळ हतबलहिरवा चारा उपलब्ध नसल्याने पशुपालकांसमोर जनावरांचे पालनपोषण करण्याचे संकट निर्माण झाले आहे. विशेषतः पूर्व भागातील मेंढपाळांना शेळ्या-मेंढ्यांसाठी चारा आणि पाणी मिळविण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.