Jat Bribe Case: जत पालिकेचा अधिकारी ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात

कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी प्रविण रंगराव बाबर याला ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले
Bribe Case
Bribe CasePudhari
Published on
Updated on

जत : जत नगरपरिषदेतील कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी प्रविण रंगराव बाबर याला ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. या कारवाईमुळे जत नगरपालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.

तक्रारदार यांचा फोटो स्टुडिओचा व्यवसाय आहे. सन २०२५ मधील जत नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेसाठी त्यांनी फोटो व व्हिडिओ शूटिंगचे काम केले होते. या कामाचे बिल मंजूर होऊन त्याचा धनादेश तक्रारदारांना मिळाला होता. हे बिल मंजूर केल्याच्या मोबदल्यात बाबर याने ७५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. या प्रकरणी तक्रारदाराने सांगली 'एसीबी'कडे तक्रार केली होती.

तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जत येथे सापळा रचला. या वेळी झालेल्या तडजोडीअंती ५० हजार रुपयांचा व्यवहार ठरला. त्यानुसार बुधवारी (दि. १०) जत येथील यशोदा फोटो स्टुडिओमध्ये तक्रारदाराकडून ठरलेली ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना प्रविण बाबर याला 'एसीबी'च्या पथकाने रंगेहात अटक केली.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सांगलीचे पोलिस उपअधीक्षक यास्मीन इनामदार यांच्या नेतृत्वाखाली पोलिस निरीक्षक योगेश चव्हाण, पोलिस अंमलदार प्रितम चौगुले, सागर नायकुडे, अजित पाटील, पोपट पाटील, उमेश जाधव, ऋषिकेश बडणीकर, मनोज निळकंठ, रामहरी वाघमोडे, धनंजय खाडे, सुदर्शन पाटील, चंद्रकांत जाधव, प्रकाश जाधव, राजेश मुदगल, महेश शेंडगे, विना जाधव आणि चालक विठ्ठलसिंग राजपूत यांच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news