Sangli Crime: जतमधील अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाबद्दल चार वर्षे कारावास

Sangli Crime: जतमधील अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाबद्दल चार वर्षे कारावास
pudhari photo
Published on
Updated on

सांगली : सहा वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी दत्तात्रय भानुदास वनखंडे (वय ३२, रा. कसनेवाडा, जत) याला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती जे. ए. मोहंती यांनी ४ वर्षे कारावास आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास १५ दिवस साध्या कैदेची ज्यादा शिक्षा भोगण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.

खटल्याची पार्श्वभूमी अशी, २५ मार्च २०१६ रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास पीडित ६ वर्षीय अल्पवयीन मुलगी तिच्या काकीकडे खेळायला जात होती. त्यावेळी दत्तात्रय वनखंडे हा त्याच्या रिक्षामध्ये बसला होता. त्याने पीडित मुलीला रिक्षात बोलावून घेऊन तिचा विनयभंग केला. यावेळी पीडित मुलगी स्वतःला सोडवण्यासाठी ओरडत होती. तिचा आवाज ऐकून काकीने तेथे धाव घेत तिची सुटका केली.

त्यानंतर हा सर्व प्रकार पीडित मुलीने आणि तिच्या काकीने मुलीच्या आईला सांगितला. पीडितेच्या आईने याप्रकरणी जत पोलिस ठाण्यात दत्तात्रय याच्याविरुद्ध फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी भा.दं.वि. कलम ३५४ आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो) कलम ७ आणि ८ अन्वये गुन्हा दाखल केला होता. न्यायालयाने दत्तात्रय वनखंडे याला दोषी ठरवून ही शिक्षा सुनावली.

या खटल्यात सरकार पक्षातर्फे सहा साक्षीदार तपासण्यात आले. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी जिल्हा वकील आरती देशपांडे-साठवीलकर यांनी काम पाहिले. या खटल्याच्या कामकाजात जत पोलिस ठाण्यातील पोलिस सचिन बंडगर, तसेच सांगली पैरवी कक्षातील महिला पोलिस रेखा खोत आणि सुनीता आवळे यांनी सरकार पक्षाला मदत केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news