जत: अपघातात बालक ठार

जत: अपघातात बालक ठार
Published on
Updated on

जत पुढारी वृत्तसेवा : धावडवाडी (ता. जत) येथे झालेल्या अपघातात अडीच वर्षे वयाचा बालक ठार झाला. अब्दुल समद साजिद शेख असे ठार झालेल्या बालकाचे नाव आहे. हा अपघात विजापूर – गुहागर राज्यमार्गावर धावडवाडीनजिक झाला.

साजिद खान नालसाब शेख व जबीन शेख हे दाम्पत्य बुलेट गाडीवरून अडीच वर्षीय मुलाला घेऊन धावडवाडी गावात आले होते. ते शेताकडे जात असताना महादेव मधुकर कुंडले (रा. जालिहाळ खुर्द) हा इंडिका गाडी घेऊन सांगलीकडे निघाला होता.

त्याच्या गाडीची धावडवाडीजवळ शेख यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक बसली. साजिद खान शेख (27) व जबीन शेख (25) हे दोघे खाली कोसळले. अब्दुलसमद शेख हा बालक ठार झाला.

या बालकाचा मृतदेह इंडिकाच्या हेडलाईटला अडकला होता. पण चालक कुंडले याच्या ते लक्षात आले नाही. त्यामुळे त्याने त्याच स्थितीत सात किलोमीटरपर्यंत बालकाला फरफटत नेले. चोरोची गावानजिक आल्यानंतर त्याच्या हा प्रकार लक्षात आला.

त्यानंतर त्याने गाडी थांबवून त्या बालकाला खाली उतरवले. तोपर्यंत गावकर्‍यांनी इंडिका गाडीचा पाठलाग करून चालकाला बेदम मारहाण करीत कवठेमहांकाळ पोलिसांच्या ताब्यात दिले.

शेख दाम्पत्य गंभीर जखमी झाल्याने त्यांना येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. चालक कुंडले याच्यावर कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला
आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news