Jat Accident : बोर्गी क्रॉस येथे अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

जत तालुक्यातील बोर्गी क्रॉस येथे पिकअपने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने एका मजुराचा मृत्यू झाला
Accident
Accident
Published on
Updated on

जत : जत तालुक्यातील बोर्गी क्रॉस येथे पिकअपने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने एका मजुराचा मृत्यू झाला. या प्रकरणी उमदी पोलिस ठाण्यात अज्ञात पिकअप चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश रामचंद्र कुचीकोरवर (वय ३५) असे मृताचे नाव असून, सुरेश रामचंद्र कुचीकोरवर यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे.

गणेश कुचीकोरवर हे ७ जून रोजी सायंकाळी बाजार करून आपल्या दुचाकीवरून (क्र. केए २८ एचएम ४११४) बोर्गीतून विजयपूर-पंढरपूर मार्गावरील बोर्गी क्रॉस येथे जात होते. बोर्गी क्रॉसजवळ पाठीमागून येणाऱ्या भरधाव पिकअपच्या (क्र. केए २८ डी ८९१३) चालकाने त्यांच्या दुचाकीस जोरदार धडक दिली.

अपघातात गणेश कुचीकोरवर हे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर पिकअप चालक वाहन सोडून पळून गेला. जखमी गणेश यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी उमदी पोलिसांनी अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news